दिल्ली मेट्रो अनेकदा चर्चेत असते ती तिथे होणाऱ्या महिलांच्या भांडणामुळे, जोडप्यांच्या इंटिमेट सीनमुळे; तर काही प्रवाशांच्या विचित्र वागणुकीच्या व्हिडीओंमुळे. अनेकदा प्रवासी सीटसाठी आपापसात भांडत असल्याचेही व्हिडीओ समोर येतात. सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोतील प्रवाशांच्या भांडणाचा असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन महिलांमध्ये एका सीटवरून शाब्दिक वाद सुरू आहे. यावेळी दोघांमधील भांडणाचा व्हिडीओ काही प्रवाशांनी कॅमेऱ्यात कैद करून इंटरनेटवर शेअर केला आहे, त्यानंतर हे प्रकरण खूप चर्चेत आले. मात्र, हा व्हिडीओ कधी आणि कोणत्या मेट्रो मार्गाचा आहे, याची पुष्टी झालेली नाही. पण हे पाहून लोक म्हणतात, दिल्ली मेट्रोमध्ये आपले स्वागत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन महिला सीटवरून आपापसात वाद घालताना दिसत आहेत. पहिली महिला सीटवर बसलेली आहे, तर दुसरी उभी आहे. सीटवर बसलेली महिला म्हणत आहे, जर तुला बोलायचा सेन्स नसेल तर तू बोलायची गरज नाही. त्यावर दुसरी महिला म्हणते की, अरे हॅलो… मला तुझ्यासारख्या महिलेशी बोलण्याचीही इच्छा वाटत नाही. यावर पहिली महिला म्हणाली, तुझ्यासारखी म्हणजे काय… आधी इंग्रजी बोलायला शिक. अशाप्रकारे या दोन्ही महिला एकमेकांबरोबर शाब्दिक वाद घालत असतात. यावेळी त्यांच्या आजूबाजूच्या महिला प्रवासी मध्यस्थी करत दोघांनी शांत राहण्याचा सल्ला देतात.
हा व्हिडीओ @gharkekalesh या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, सीटसाठी दिल्ली मेट्रोमध्ये भांडणाऱ्या महिला. या व्हिडीओला एक हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, जो आधी बसतो त्याची सीट होते, हे सिंपल आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, जेव्हा मी प्रवास करते तेव्हा मला कोणताही त्रास होत नाही. यावर तिसऱ्या युजरने लिहिले की, दिल्ली मेट्रोमध्ये आपले स्वागत आहे… आज महिला कोचमध्ये लढत होत आहे. धन्यवाद. अशा अनेक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.