टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये गुरुवारी झिम्बाब्वेने पाकिस्तानला अनपेक्षितरित्या अवघ्या एका धावेने पराभूत केल्यानंतर झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांनी खोचक ट्वीटमधून पाकिस्तानला टोला लगावला. या ट्वीटला आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तितक्याच खोचक पद्धतीने रिप्लाय दिला आहे. मैदानातील रोमहर्षक सामन्यानंतर आता दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांमध्ये हा शाब्दिक टोल्यांचा सामनाही चर्चेचा विषय ठरताना दिसतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> पाकिस्तान T20 World Cup मधून जवळजवळ बाहेर! मात्र भारताच्या हाती आहे पाकच्या सेमी फायनलचं तिकीट; समजून घ्या Points Table

अवघ्या एका धावेने झिम्बाबेच्या संघाने पाकिस्तानचा पराभव करत यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये गुरुवारी आणखीन एका धक्कादायक निकालाची नोंद केली. अवघ्या १३१ धावांचं लक्ष्यही पाकिस्तानला १२० चेंडूंमध्ये पूर्ण करता आलं नाही. पाकिस्तानला निर्धारित २० षटकांमध्ये १२९ धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानने या स्पर्धेमधील सलग दुसरा सामना शेवटच्या चेंडूवर गमावल्यानंतर झिम्बाबेचे राष्ट्राध्यक्ष इमर्सन डंबुडझो मनंगाग्वा यांनी ट्वीटरवरुन टोमणा मारला.

नक्की पाहा >> विराट कोहलीचा मराठीत रिप्लाय! सूर्यकुमार यादवबरोबरच्या मैदानाबाहेरची पार्टनरशीप अन् ‘त्या’ कमेंट्सची तुफान चर्चा

अनपेक्षितरित्या पाकिस्तानला पराभूत करणाऱ्या झिम्बाब्वेच्या पंतप्रधानांनीही या वादाचा संदर्भ देत सामन्यानंतर पाकिस्तानला ट्रोल केलं आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाला झिम्बाब्वेने गुरुवारी अगदी शेवटच्या चेंडूवर एका धावेने पराभूत केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष इमर्सन डंबुडझो मनंगाग्वा यांनी एक ट्वीट केलं. पाकिस्तानने यापुढे तरी खरा मिस्टर बीन पाठवावा अशी अपेक्षा मनंगाग्वा यांनी व्यक्त केली. “फारच भन्नाट विजय मिळला झिम्बाब्वेला! अभिनंदन संपूर्ण संघाचं. पुढील वेळेस खरा मीस्टर बीन पाठवा…” असं मनंगाग्वा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं. त्यांनी पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे हा हॅशटॅगही वापरला.

नक्की वाचा >> Zimbabwe Beat Pakistan: झिम्बाब्वेच्या संघातून खेळणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजाने मिळवून दिला विजय; ठरला सामनावीर

पाकिस्तानी पंतप्रधानांचा रिप्लाय
मनंगाग्वा यांचं ट्वीट कोट करुन पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. “आमच्याकडे खरा मिस्टर बीन नसला तरी आम्च्याकडे क्रिकेटमधील खरी खेळाडूवृत्ती आहे. आम्हा पाकिस्तान्यांना अपयशामधून पुन्हा उसळून वर येण्याची मजेदार सवय आहे. मिस्टर प्रेसिडंट अभिनंदन… तुमचा संघ आज खरोखरच चांगलं खेळला,” असं पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले आहेत. त्यांनी या ट्वीटमध्ये इमोंजीचाही वापर केला आहे.

नक्की पाहा >> Video: आनंदी आनंद गडे… सूर्यकुमारने शेवटच्या चेंडूवर Six मारत अर्धशतक पूर्ण केल्यावर कोहलीचं मैदानातच मजेदार सेलिब्रेशन

पाकिस्तानी बीन प्रकरण काय?
पाकिस्तान क्रिकेटच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आलेल्या फोटोंवरुन हा वाद सुरु झाला. पाकिस्तानी संघ झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यासाठी तयारी करत असल्याचे फोटो २५ ऑक्टोबर रोजी म्हणजेच भारताकडून पराभूत झाल्याच्या दोन दिवसांनंतर पोस्ट करण्यात आले होत्. यावर निगुगी चासुरा या झिम्बाब्वेच्या चाहत्याने रिप्लाय केला होता. “आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही एकदा आम्हाला मिस्टर बीन रोवॅनऐवजी खोटा मिस्टर बीन दिला होता. आम्ही उद्या हे प्रकरण तुम्हाला पराभूत करुन मार्गी लावणार आहोत. पाऊस पडणार नाही प्रार्थना करा,” असं या चाहत्याने म्हटलं होतं.

नक्की वाचा >> India Beats Netherlands: विजयानंतर काही मिनिटांमध्ये ‘ती’ पोस्ट करणं दिनेश कार्तिकला महागात पडलं; अनेकांनी झापलं

यावर एका पाकिस्तानी चाहत्याने उत्सुकतेनं नेमका याचा संदर्भ काय असं विचारलं होतं. त्यावर असिफ मोहम्मद हा पाकिस्तानी स्टॅण्डअप कॉमेडियन मिस्टर बीनसारखा दिसतो आणि २०१६ साली तो झिम्बाब्वेला गेला होता. त्याने तिथे अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती. त्याने अनेक रोड शो केले होते. हरारेमधील शेती विषयक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्याने हा दौरा केला होता. असिफ यांची ओळख ‘पाक बीन’ अशी आहे. या झिम्बाब्वे दौऱ्यामध्ये केवळ मिस्टर बीनप्रमाणे दिसतो या एका कारणासाठी असिफ यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती.