PAK vs BAN : क्रिकेट हा प्रत्येकाचा आवडीचा विषय आहे. कोणताही सामना असला तरी लोक आवडीने बघतात. भारत पाकिस्तानचा सामना राहिला तर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगते. सध्या अशीच चर्चा एका सामन्याची रंगली आहे. हा सामना भारत पाकिस्तानचा नव्हे तर बांग्लादेश पाकिस्तान या दोन देशांमधील सामना आहे.
बांगलादेशने क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिका जिंकली आहे. बांगलादेशने सलग दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ तुफान ट्रोल होत आहे. सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहे. सध्या काही मीम्स चांगलेच चर्चेत आले आहे. त्यातील काही मीम्स खालीलप्रमाणे – (Pakistan vs Bangladesh memes:)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल फोटोमध्ये बांगलादेशच्या खेळाडूच्या चेहऱ्यावर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा फोटो लावलेला दिसत आहे. या फोटोवर लिहिलेय, “बांगलादेशचे खेळाडू पाकिस्तान टीमकडे कसे बघतात?”

या मीममध्ये अजय देवगणचा फोटो दिसत आहे आणि फोटोवर लिहिलेय, “काही बदलले नाही, आजही सर्व जसेच्या तसे आहे” आणि कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पाकिस्तान टीम आणि त्यांची जुनी कहाणी”

सोशल मीडियावर पाकिस्तानला चांगलेच ट्रोल केले जात आहे. या पोस्टमध्ये पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदचा रेकॉर्ड सांगितला आहे. या पोस्टमध्ये शान मसूदचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलेय, “शान मसूद एकमेव कर्णधार आहे जो पहिले पाच कसोटी सामने एका मागोमाग हरला. तो एकमेव असा कर्णधार आहे जो कर्णधार म्हणून पहिले दोन कसोटी सामने हरला. आणि तो एकमेव असा कर्णधार आहे जो बांगलादेशविरुद्ध पहिले दोन सामने हरला.”

हेही वाचा : WTC Points Table : पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेशची मोठी झेप, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेलाही टाकलं मागे

या पोस्टमध्ये एका बाजूला मोदींचा फोटो दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या खेळाडूंचा फोटो दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” बांगलादेशनी पाकिस्तानला दुसर्‍या कसोटीमध्ये हरवत विजय मिळवला आणि या पाकिस्तानच्या लोकांना काश्मीर पाहिजे.”

एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पंचायत वेब सीरीजचे एक दृश्य दाखवले आहे ज्यामध्ये अभिषेक तिवारी, प्रल्हाद पांडे, विकास आणि प्रधानजी हसताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भारतीय चाहते पाकिस्तान आणि बांगलादेशची मॅच बघितल्यानंतर..”

एका युजरने लिहिलेय, “एक शेजारी खूश तर एक शेजारी नाराज”
https://x.com/sachinbapure/status/1830939224171765838

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs ban match bangladesh beat pakistan by 6 wickets trending memes viral on social media ndj