मेलबर्नमध्ये खेळाला गेलेल्या टी२० विश्वचषकातील अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला ५ गडी राखून पराभूत केले. टी२० विश्वचषकातील इतिहासात इंग्लंडने दुसऱ्यांदा या चषकावर आपले नाव कोरले आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या गोलंदाजांनीही हा निर्णय सार्थ ठरवत पाकिस्तानला २० षटकांमध्ये १३७ धावांवरच रोखून ठेवले. दरम्यान, काही क्षणांसाठी वाटले की सामना इंग्लंडच्या हातातून निसटू शकतो. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानविरूद्ध जोरदार लढा दिला. याचदरम्यान आता सोशल मीडियावर एका हताश झालेल्या पाकिस्तानी फॅनचे नवीन मीम व्हायरल झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेलबर्न मैदानावर हा सामना सुरु होता त्याचवेळेला नेटकरी ट्विटरवर पाकिस्तानच्या फलंदाजी आणि जिंकण्याच्या शक्यतांवर मीम्स शेअर करत होते. यावेळी अनेकजण वेगळ्या आणि भन्नाट मीमच्या शोधात होते. मात्र, त्यांना एक चांगले मीम सापडले आहे. हे मीम म्हणजे पाकिस्तान संघाला हरताना पाहून एक चाहता हताश झाला होता. या चाहत्याला पाहून २०१९ साली पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामान्यात हताश झालेल्या एक चाहत्यावर तयार झालेले व्हायरल मीम तुम्हाला नक्कीच आठवतील. यानंतर नेटकऱ्यांना एक नवं मीम मटेरियल मिळालं आहे.

PAK vs ENG: “त्याने काहीही फरक पडला नसता”; शाहीन आफ्रिदीच्या दुखापतीवर सुनील गावस्करांचं मोठं वक्तव्य

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड या सामन्यात पाकिस्तानची जर्सी घातलेला एक चाहता २०१९ साली मीम म्हणून व्हायरल झालेल्या सरीम अख्तर सारखा उभा असलेला पाहायला मिळाला. यानंतर नेटकरी या व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. दुसरीकडे, इंग्लंडने दुसऱ्यांदा टी२० विश्वचषक आपल्या नावे केला आहे. यापूर्वी २०१० मध्ये अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव करून ही स्पर्धा जिंकली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs eng netizens got new meme material after pakistan defeat disappointed pakistani fan video shared by icc pvp
Show comments