पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. २७ वर्षीय बाबर आझमची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारी उत्कृष्ट आहे आणि सध्या क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील टॉप-३ फलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे. उजव्या हाताच्या फलंदाजाने यावर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आणि आठ सामन्यांमध्ये सात अर्धशतके झळकावली आहेत.

पाकिस्तान संघ सध्या नेदरलँडमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे. अनेकदा आपल्या फलंदाजीसाठी चर्चेत राहणारा बाबर आझम सध्या चुकीच्या कारणामुळे चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. पाकिस्तानच्या विजयानंतर बाबर आझमचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याच्या इंग्रजीची खिल्ली उडवली जात आहे. बाबरने सांगितले की, ‘वेगवान गोलंदाजांचा एक चांगला प्रयत्न होता. त्यांनी नव्या चेंडूने चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे आम्ही आनंदी आहोत.’

IND vs ZIM: झिम्बाब्वेमधील महिला फॅनला पडली दीपक चहरची भुरळ; सामन्यादरम्यानच केली ‘ही’ विचित्र मागणी

तो पुढे म्हणाला, “सकाळी खेळपट्टी ओलसर होती. त्यामुळे मी आधी गोलंदाजी करण्याचा विचार केला. आम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन ट्राय करतोय, सलमानने आज त्याचा क्लास दाखवला. तो खूप चांगला खेळला. त्यामुळे आता पुढील सामन्यावर आमचे लक्ष आहे.” पाकिस्तानी क्रिकेटपटूंची इंग्रजी बोलण्याबद्दल टिंगल केली जाते आणि बाबर आझमही त्याला अपवाद नाही. त्याचा व्हिडीओ इंटरनेटवर येताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या अनुभवी फलंदाजाची खिल्ली उडवली.

IND vs ZIM: राष्ट्रगीत सुरू असताना मधमाशीने केला ईशान किशनवर हल्ला; बघा काय होती त्याची रिअ‍ॅक्शन

बाबर आझम सहजतेने धावा करत असून आगामी सामन्यांमध्येही त्याची कामगिरी कायम राहील अशी अपेक्षा करण्यात येत आहे. यानंतर पाकिस्तानला आशिया चषकात सहभागी व्हायचे आहे, त्यानंतर सात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी इंग्लंडचे यजमानपद करायचे आहे. त्यानंतर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाला टी-२० विश्वचषकात सहभागी व्हायचे आहे.