पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या कर्मचा-यांनी विमान उड्ड्णाच्या आधी चक्क एका बक-याची कुर्बानी दिली आहे. विमान उड्डाण यशस्वी व्हावे यासाठी त्याने विमानतळावर काळ्या बक-याची कुर्बानी दिली. काहीच दिवसांपूर्वी याच एअरलाईनचे एक विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. यात ४७ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. पण विमान कर्मचा-यांच्या या प्रकारामुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
VIDEO : जेव्हा जंगलाची राणी गावात येते
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या काही कर्माचा-यांनी इस्लामाबाद विमानतळावर विमान उड्डाणाच्या आधी बक-याची कुर्बानी दिली. याचा फोटो अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. ‘कुर्बानी देऊन कोणताही प्रवास सुरक्षित होत नाही. या अंधश्रद्धा असून त्यापेक्षा विमानाच्या सुरक्षेवर अधिक भर द्या’ अशा प्रतिक्रिया येत आहे. त्यानंतर या विमानसेवेने अधिकृतपणे आपले या कुर्बानीला कोणतेही समर्थन नसल्याचे स्पष्ट केले. विमानसेवेच्या व्यवस्थापनाने याला पाठिंबा दिला नसल्याचेही त्याने सांगितले. कुर्बानी दिल्याचा फोटो ट्विटर, फेसबुक यासारख्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
VIRAL VIDEO : पैशांसाठी नाही तर खरेदीसाठी लावली भलीमोठी रांग
तर दुसरीकडे पाकिस्तानेच आघाडीचे दैनिक ‘डॉन’च्या पहिल्या पानावरही ही बातमी होती. ‘पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईनचे विमान हे पंख आणि प्रार्थनेवर उडते’ अशा उपहासात्मक मथळयाखाली यावर टिका करण्यात आली. ७ डिसेंबरला या एअरलाईनेच विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. या विमानाने नंतर पेट घेतला आणि यात ४७ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अशी अप्रिय घटना पुन्हा होऊ नये यासाठी कर्मचा-यांनी विमान उड्डाणाआधीच बक-याची कुर्बानी दिली. पण दुसरीकडे मात्र कुर्बानी देऊन काही होणार नाही त्यापेक्षा विमानाची सुरक्षेच्या दृष्टीने चाचणी करा असा सल्लाही या विमान कंपनीला देण्यात आला आहे.