Pakistan Army Viral Video: शेजारी देश पाकिस्तान आपल्या विचित्र गोष्टींसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या दरम्यान अर्थव्यवस्था ढासळलेल्या पाकिस्तानचा एक कारनामा पुढं आला आहे. पाकिस्तानच्या लष्कराचा लाजिरवाणा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. आपल्याकडे भारतीय लष्करातील जवानांचे कार्य देशवासियांसाठी अनमोल आहे. देशवासियांवर ज्या ज्या वेळी एखादं संकट ओढावतं तेव्हा जवानच मदतीसाठी तत्पर असतात. मग ते सीमेचे रक्षण असो की देशातील काही समस्या लष्करातील जवान देशवासियांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असतात. आपल्या देशात तर सैनिकांना मोठा सन्मान दिला जातो. पण, दुर्दैवानं सर्वच देशांमध्ये असं चित्र पाहायला मिळेलच असं नाही. कथित स्वरुपात पाकिस्तानचा एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामुळं नेटकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
पाकिस्तान देश बऱ्याचंदा आपल्या विचित्र कारनाम्यांमुळे चर्चेत येतो. बऱ्याचंदा तिथले लोकं असं काही करतात की ज्यामुळे पाकिस्तानची खिल्ली उडवली जाते. यावेळी पाकिस्तानचा असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे की, जो पाहून तुमच्याकडे त्यांच्यासाठी शब्दच राहणार नाहीत. पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि खैबर पख्तुन्वा प्रांतामध्ये मागील महिन्याभरात मोठ्या संख्येने अधिक जवान शहीद झाले. याच पार्श्वभूमीवर सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत असल्यानुसार पाकिस्तानी लष्कराचे जवान शहीद जवानांचे पार्थिव चक्क गाढवांवर वाहून नेत आहेत. विश्वास बसत नाही ना तुम्हीच पाहा हा व्हिडीओ, हे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी यावर संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत. @Nighat_Abbass नावाच्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओ शेअर करताना यूजरने टीका केली आहे. “२०० अब्ज डॉलर्सचे व्यवसायिक साम्राज्य असलेल्या पाक लष्करी माफियाकडे जनरल्स आणि त्यांच्या कुटुंबियांना इतरत्र गोल्फ खेळायला नेण्यासाठी निधी आहे पण त्यांच्या शहीद सैनिकांना नेण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवणे परवडणारे नाही.” असं कॅप्शन लिहलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> पाकिस्तानात भिकाऱ्यानं पार्टीवर खर्च केले १.२५ कोटी रुपये; २० हजार लोक अन् शाही दावत; VIDEO पाहून श्रीमंतही लाजेल
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वेस्थानकावर आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. या आत्मघाती विस्फोटामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला होता तर अधिक लोक जखमी झाले होते. दरम्यान शहराच्या सुरक्षेसाठी बलुचिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे