पाकिस्तानात धर्माच्या आधारावर भेदभाव केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. हिंदू मंदिरांची नासधूस करण्यासोबत इतर धर्मियांना त्रास दिला जातो. यावर कारवाई करण्याबाबत सरकारकडून पोकळ आश्वासनं दिली जातात. मात्र प्रत्यक्षात कोणतीच कारवाई होत नाही. पाकिस्तान सरकारनं तर तालिबानचं उघडपणे समर्थन दिलं आहे. त्यामुळे पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदाय भीतीच्या सावटाखाली राहात आहे. आता एका बेकरी शॉपमधून असाच एक प्रकार समोर आला आहे. बेकरी शॉपमधील कर्मचाऱ्याने केकवर मेरी ख्रिसमस लिहिण्यास नकार दिला. तो इतक्यावरच थांबला नाही तर दुकानाने तसे आदेश दिल्याचे त्याने सांगितलं. या घटनेनंतर सोशल मीडियावर त्या दुकानाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रत्येकजण बेकरी शॉपला ट्रोल करत आहे. तसेच तक्रार करणाऱ्या ग्राहकाच्या बाजूने उभे राहात आहेत.

वाद वाढल्याचं पाहून बेकरी मॅनेजमेंटचे धाबे दणाणले आहेत. मॅनेजमेंटने कोणताच भेदभाव करत नसल्याची सारवासारव केली आहे. कर्मचाऱ्याचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत हात झटकले आहेत. तसेच चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे.

कॉलेजच्या ऑफिसमध्ये पडलेल्या बॉक्समध्ये सापडले दीड कोटी रुपये; चिठ्ठीत लिहीलेलं कारण वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

पाकिस्तान घडलेली ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी २०१८ मध्ये एका बेकरीत असाच प्रकार घडला होता. तेव्हाही एका दुकानदाराने केकवर मेरी ख्रिसमस लिहिण्यास नकार दिला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यावर ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे आता घडलेल्या घटनेनंतर नेटकऱ्यांनी पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या विचारशैलीला धारेवर धरलं आहे.

Story img Loader