Pakistan Defeating Australian Cricketer Chants Bharat Mata Ki Jay: विश्वचषक २०२३ मध्ये सध्या पॉईंट टेबलमध्ये २ विजय व २ पराभवांसह पाकिस्तान पाचव्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा ६२ धावांनी पराभव झाला होता तर भारतासमोरही पाकिस्तानने गुडघे टेकले होते. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या वेळी तर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊसच कोसळत होता पण अगदी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला हरवल्यावर सुद्धा व्हायरल व्हिडीओ व पोस्ट्सचं वादळ शमत नव्हतं. असाच एक व्हिडीओ लाइटहाऊस जर्नलिझमला आढळून आला ज्यामध्ये पाकिस्तानला हरवल्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडू भारत माता की जय अशा घोषणा देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
काय होत आहे व्हायरल?
Sudarshan News ने व्हायरल व्हिडिओ X, म्हणजेच Twitter वर शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील हाच व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आणि त्यातून कीफ्रेम मिळवून तपास सुरू केला. आम्ही फोटोवर गूगल रिव्हर्स इमेज फीचर वापरून तपास पुढे नेताच आम्हाला स्क्रीनशॉटसह एक बातमी आढळली.
रिपोर्ट चे हेडिंग होते: Aussie fan goes “Bharat mata ki jai” in Brisbane after India wins Test (भाषांतर: ऑस्ट्रेलियातील एका क्रिकेटप्रेमीने ब्रिस्बेनमध्ये भारत टेस्ट क्रिकेट मॅच जिंकल्यावर भारत माता की जय अशा घोषणा दिल्या होत्या.
हे आर्टिकल १९ जानेवारी २०२१ रोजी अपलोड केलेले होते. आम्हाला CricTracker वर एक बातमी देखील आढळली.
२० जानेवारी २०२१ रोजी अपलोड केलेल्या आर्टिकलचे हेडिंगही आधीसारखेच होते. याशिवाय आम्हाला Dr Ashutosh Misra यांच्या X (पूर्व ट्विटर) प्रोफाइल वर व्हायरल व्हिडिओ सापडला.
व्हिडिओ १८ जानेवारी २०२१ रोजी अपलोड करण्यात आला होता.
निष्कर्ष: ‘भारत माता की जय’ असा जयघोष करणार्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा असल्याचा दावा केलेला व्हायरल व्हिडिओ २०२१ ला ब्रिस्बेनमध्ये जयघोष करणार्या क्रिकेट चाहत्याचा आहे.