सध्या पाकिस्तानात सुरु असलेला सत्ताबदल हा जगभरात चर्चेचा विषय ठरतो आहे. तेहरिक ए इन्साफ पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान हे पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान होण्याच्या तयारीत आहेत. मतमोजणीमध्ये इम्रान खान यांच्या पक्षाने १०० चा आकडा ओलांडला आहे. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या १३७ जागा न मिळाल्यास इतर पक्षांच्या मदतीने इम्रान खान सत्ता स्थापन करु शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

BBC Newsnight या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर इम्रान खानऐवजी पाकचा माजी खेळाडू वासिम अक्रमची छोटीशी व्हिडीओ क्लिप पोस्ट केली.

मात्र ही चूक लक्षात येईपर्यंत नेटकऱ्यांनी BBC Newsnight ला चांगलचं ट्रोल केलं. सोशल मीडियावर BBC Newslight कडून झालेल्या या चुकीचे स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.

काही वेळानंतर BBC Newsnight ने आपली चूक मान्य करत ट्विटरवर माफीही मागितली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan elections 2018 bbc newsnight confuses imran khan with wasim akram gets trolled