अंकिता देशकर

Pakistan EX PM Imran Khan Viral Photo: लाईटहाऊस जर्नालिज्मला एक फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. या फोटोमध्ये पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान तुरुंगात फरशी वर बसलेले दिसतात. व्हायरल फोटोसह उर्दूमध्ये लिहिलेल्या काही कॅप्शनचा अनुवाद केला असता यात नेटकऱ्यांना इम्रान खान यांच्याविषयी सहानुभूती वाटत असल्याचे दिसतेय. इम्रान खान हे दिवसभरात पाच वेळा नमाज पठण करतात, व्यायाम करतात, दिवसभर कुराण पठण करतात, असे पोलीस सांगत असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे.

supriya sule remarks on candidate selection process in sharad pawar
“मी त्यांना दुखवून कुठलाही निर्णय घेणार नाही”, उमेदवार निवडीवरून काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
mohhammad mizzu meet india
भारतविरोधी भूमिका घेणारे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष भारत दौर्‍यावर; या दौर्‍यामागील त्यांचा उद्देश काय?
Hindenburg on Madhabi Puri Buch
‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांना संसदेच्या लोकलेखा समितीचे समन्स; हिंडेनबर्गच्या आरोपांची चौकशी होणार?
Israel air strike on gaza news in marathi
Israel Attack on Hamas : हमास सरकारमधील तीन दहशतवाद्यांचा खात्मा, इस्रायलचा दावा; लष्कराने फोटोंसहित दिली माहिती!
‘वंचित’च्या निदर्शनांची दिशा काय?
PM narendra modi Chandrababu Naidu and Nitish kumar
तिरुपती लाडू भेसळ वाद आणि नितीश कुमारांकडून राम मंदिराचे कौतुक; भाजपाच्या मित्रपक्षांनीही रेटला हिंदुत्वाचा मुद्दा
First photo of British Prime Minister Keir Starmer's new cat
इंग्लडच्या पंतप्रधानांच्या मांजरीचंही कौतुक; एक्सवर व्हायरल होतोय फोटो

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Asad Malik ने व्हायरल हिटर त्यांच्या प्रोफाइल वर शेअर केले.

अन्य यूजर देखील हे चित्र शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही इमेजवर एक साधा गूगल रिव्हर्स इमेज सर्च चालवून आमच्या तपासाची सुरुवात केली.या वरून आम्हाला The Pakistan Daily या वर केलेले एक ट्विट सापडले.

या ट्विट चे शीर्षक होते, ‘PTI’s Ali Mohammad Khan in jail’.

आम्हाला हेच फोटो अजून काही जणांच्या प्रोफाइल वर सापडले.

त्यानंतर आम्ही फोटोसह शेअर केलेल्या मथळ्यांवर गूगल कीवर्ड शोधले. आम्हाला अली मोहम्मद खान यांच्या अटकेची बातमी aajenglish.tv वर सापडली.

https://www.aajenglish.tv/news/30323882/ptis-ali-muhammad-khan-arrested-again

हि बातमी ८ जून २०२३ रोजी शेअर केली होती.

बातमीत म्हटले होते की, पीटीआय नेते अली मुहम्मद खान यांना गुरुवारी पेशावर सेंट्रल जेलमधून सुटल्यानंतर चौथ्यांदा अटक करण्यात आली. पेशावर उच्च न्यायालयाने बुधवारी खान यांची सुटका करण्याचे आदेश दिले आणि त्यांना १ लाख रुपयांचा जामीन जातमुचलक जमा करण्याचे आदेश दिले.

आम्हाला या बद्दल अजून काही बातम्या आपल्या.

https://www.dawn.com/news/1762236
https://www.thenews.com.pk/latest/1085558-court-sends-ptis-ali-muhammad-khan-to-jail-on-judicial-remand

आम्ही डॉन न्यूज, पाकिस्तान येथील ज्येष्ठ पत्रकार सागर सुहिंदेरो यांच्याशीही संपर्क साधला. त्यांनी सुद्धा हे फोटोशॉप केलेले चित्र आहे असे सांगितले.

हे ही वाचा<< मुस्लिमबहुल भागात भगवा स्कार्फ घातल्यावरून हाणामारी? दृश्य पाहून लोकं म्हणतात, “हे सेक्युलर..”, एकदा नीट बघा

निष्कर्ष: अली मोहम्मद खान यांचे छायाचित्र पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे तुरुंगात असलेले अलीकडील फोटो म्हणून एडिट करून शेअर केले जात आहे