भारत आपला देश आहे आणि सारे भारतीय बांधव उभ्याने प्रवास करण्यात माहीर आहेत कारण त्यांच्या गावांवर त्यांचं प्रेम आहे. त्यांच्या गावातल्या विविधतेने नटलेल्या हिरवळीचा त्यांना अभिमान आहे आणि त्यासाठी ते कायपण करायला तयार आहेत. मग ती एसटी असो की एक्सप्रेस. आयुष्यात लटकत लटकत पुढे जायची आपल्या सगळ्यांना सवय झालीये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पण १२ तास घामट प्रवास करण्यात हुशार असलेले सगळेजण विमानाने जायचं म्हणजे एकदम गुळगुळीत वागायला लागतात. यार आपला पण काहीतली क्लास आहे.

पण पाकिस्तान एअरलाईन्समध्ये एक विचित्र प्रकार घडला. कराची ते मदिना या फ्लाईटदरम्यान या विमानात सात जणांनी उभ्याने प्रवास केल्याचं समोर आलाय. आणि यामुळे जगभर खळबळ उडालीये.

आता विमानात उभ्याने प्रवास केला त्यात काय आहे वगैरे मनात येत असेल तर एेका. अशा पध्दतीने विमानामधून प्रवास करण्यावर जगभर सक्त मनाई आहे. कारण विमानप्रवासादरम्यान अनेक दुर्घटना होऊ शकतात आणि त्यावेळी हे ‘ष्टँडिंगवाले’ एकतर स्वत: ‘बुरी मौत मरू शकतात’ नाहीतर बाकीच्या प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकतात. विमानप्रवासादरम्यान काही वेळी विमानातलं आ‌ॅक्सिजनचं प्रमाण कमी होतं. यापासून प्रवाशांचा बचाव करण्याची यंत्रणा विमानात आधीपासूनच कार्यरत असते पण कधी या यंत्रणेच्या क्षमतेच्या पलीकडे विमानातली आॅक्सिजनची पातळी घसरली तर प्रत्येक प्रवाशाच्या सीटच्या वर आॅक्सिजन मास्क ची व्यवस्था केलेली असते. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत या मास्कने प्रवासी श्वास घेऊ शकतात.

आता ही अशी परिस्थिती उद्भवल्यावर हे उभे असणारे प्रवासी काय करणार? कारण त्यांच्यासाठी मास्क वगैरे नसतो. मग यांनी गोंधळ घातला तर काय घ्या.

व्हिडिओ: तिची छेड काढणाऱ्यांना तिने दाखवला इंगा

हे फक्त एक उदाहरण झालं. अशा अनेक शक्याशक्यतांचा विचार करून विमानप्रवासाचे नियम बनवलेले असतात आणि ते अतिशय कडकपणे पाळले जातात. पाकिस्तान एअरलाईन्सवर यामुळेच जगभरातून टीका होत आहे.

कधीही काहीही झालं तरी पाकिस्तानी सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया कमालीच्या उडवाउडवीच्या असतात. आताही पाकिस्तान एअरलाईन्सच्या प्रवक्त्याने “झाल्या प्रकाराची जबाबदारी कोणाची हे निश्चित झाल्यावर मगच कारवाई केली जाईल” असं तद्दन भंपक सरकारी उत्तर दिलंय. ‘डाॅन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राने याप्रकाराबाबतची सगळी माहिती जाहीर केली आहे.

हे सातजण हे विमान रनवेवर काहीसं पुढे गेल्यानंतर हाताने लिहिलेले बोर्डिंग पास दाखवत विमानात शिरले होते. आता ते नागरिक होते, दहशतवादी होते की आणखी कोणी याचा काहीच पत्ता नाही.

मामला गडबड है!