Pakistan Is Fan Of PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता जगभरात आहे. जगभरातील सर्व राष्ट्रांच्या प्रमुख नेत्यांमध्ये गूगलवर सर्वाधिक सर्च केले जाणारे पंतप्रधान म्हणून मोदींचे नाव घेतले जाते. अगदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायदान व ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सूनक यांचाही क्रम मोदींच्या नंतरच येतो. सप्टेंबरमधील ग्लोबल रेटिंग अप्रूवल च्या अहवालात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत मोदींनी पहिला क्रमांक पटकावला होता. अमेरिका, इटली, आखाती देशांसह भारताचा शेजारी पाकिस्तान सुद्धा मोदींच्या चाहत्यांच्या यादीत समाविष्ट आहे. याचा खुलासा कुण्या अहवालाने नव्हे तर प्रियकराला भारतातून पाकिस्तानला गेलेल्या आणि मग माघारी आलेल्या अंजुने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजस्थानमधील ३४ वर्षीय अंजू राफेल या मुलीने जुलै महिन्यात पाकिस्तानात पळून जाऊन तिच्या फेसबुकवरील मित्राशी लग्नगाठ बांधली होती. हे लग्न झाल्यानंतर अंजू चर्चेत आली होती. २९ नोव्हेंबरला अंजुने भारतात आल्यावर मोदींच्या लोकप्रियतेबाबत खास भाष्य केले. अंजुने सांगितले की, ” पाकिस्तानातील लोकांना मोदी प्रचंड आवडतात, अगदी मोदींसारखाच एखादा नेता त्यांना त्यांच्याही केंद्र सरकारमध्ये हवा आहे.”

टाइम्स नाऊ व नवभारतला दिलेल्या मुलाखतीत अंजुने सांगितलं की, पाकिस्तानातील तिचा ‘फेसबुक फ्रेंड’ नसरुल्ला याच्याबरोबर राजकारणाशी संबंधित कुठल्याच गोष्टीवर गप्पा किंवा चर्चा झाली नाही पण पाकिस्तानात वास्तव्याला असताना तिथल्या जनतेच्या मनातील मोदींविषयीचे कुतुहूल व प्रेम तिने पाहिले आहे. पाकिस्तानी लोकांना मोदींच्या विषयी जाणून घेण्यात खूपच रस होता. ते अंजुला नेहमी मोदींशी संबंधित प्रश्न विचारायचे असेही ती म्हणाली. इतकंच नाही तर मोदींसारखा नेता पाकिस्तानात असता तर आज पाकिस्तानचा सुद्धा विकास झाला असता असेही तिथले लोक म्हणतात असं अंजुने सांगितलं.

हे ही वाचा<< ४९० कोटींचं लग्न लागताच आता नवरदेवाला २५ वर्षं तुरुंगवासाची शिक्षा होणार? पूर्ण प्रकरण जाणून व्हाल थक्क

दरम्यान, अंजु आणि नसरुल्ला एकत्र राहणार का? अंजुच्या मुलांचा नसरुल्ला स्वीकार करणार का हे सर्व काही नंतर ठरवलं जाईल असं तिने मुलाखतीत सांगितलं. शिवाय मी पाकिस्तानात कायदेशीर पद्धतीनेच गेले होते, मी काही पाकिस्तानला प्रवास करणारी पहिली व्यक्ती नाही, लोकांनी मी माझ्या मुलांना टाकून पळून गेले अशा कहाण्या बनवल्या आहेत. माझ्या मुलांना नसरुल्ला विषयी आधीच माहित होतं आणि त्यांच्यात अनेकदा संभाषण सुद्धा झालं होतं. माझा हेतू शुद्ध होता आणि विनाकारण माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही अंजुने म्हटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan modi fans huge craze in pakistani people says anju who ran away to marry facebook friend clears claim of illegally running svs
Show comments