VIDEO : पाकिस्तानमध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या महागाईचा फटका पाकिस्तानातील सामान्य जनतेला बसतोय. सध्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तरुणाने एक जुगाडू गाडी बनवली आहे. विशेष म्हणजे ही गाडी पेट्रोल शिवाय चालणारी आहे. सध्या या जुगाडू गाडीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडीओ एका कार चालकाने शुट केला आहे. तुम्हाला व्हिडीओत दिसेल की कारच्या पुढे एक अनोखी जुगाडू गाडी चालवताना एक तरुण दिसत आहे. काटक्यांची मोळीपासून बनवलेली ही गाडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे तरुण ही गाडी महामार्गावर चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानचा असे सांगितले जात आहे पण, यासंदर्भात कोणतीही ठोस माहिती अद्याप उपलब्ध नाही.

हेही वाचा : Optical Illusion : तुम्हाला फोटोमध्ये सिंहांचा कळप दिसतो की सचिन तेंडुलकर? एकदा पाहा नीट क्लिक करून….

हा व्हायरल व्हिडीओ @rose_k01 या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “पेट्रोलचे दर वाढल्यानंतर पाकिस्तानी जुगाड” या व्हिडीओर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “गरज ही शोधाची जननी आहे”
पाकिस्तानमध्ये वारंवार इंधनाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे सामान्य येथील सामान्य नागरिक त्रस्त आहे. वाढत्या महागाईमुळे पाकिस्तानवर लोकं सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टिका करताना दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan petrol prices hike a young man made vehicle to save from petrol prices jugaad viral video ndj
Show comments