Pakistan viral video: स्ट्रिट फूड हे अनेक लोकांसाठी जीव की प्राण आहे. लोक काहीही विचार न करता आपल्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी स्ट्रिट फुड खातात, जे कधी कधी खरोखरच टेस्टी असतात. पण असं असलं तरी देखील हे पदार्थ किती हायजेनिक किंवा साफ आणि स्वच्छ ठिकाणी बनवलेले असतात? अनेकदा फारच गलिच्छ पद्धतीने स्ट्रिटफूड बनवले जाते. जे खाणं तर सोडा ते बनवताना पाहानं देखील आपल्याला शक्य होत नाही. यासंबंधीचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर समोर आलेले तुम्ही पाहिलेच असेल. असाच एक पाकिस्तानमधला व्हिडीओ सध्या समोर आला आहे. पाकिस्तानात नाश्त्याला काय खातात तुम्ही कधी विचार केला आहे का? पाकिस्तानच्या स्पेशल नाश्त्याचा व्हिडिओ पाहूनच अनेकांना उलट्या झाल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतं हे तुम्हीच सांगा.
पाकिस्तानचा स्पेशल नाश्ता
हा व्हिडीओ पाकिस्तानमधील पेशवार या शहरातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला नाश्ता विकण्यासाठी बसला आहे. हा व्यक्ती सुरुवातीला एक मोठं भांडं आहे. थोड्या वेळाने ती व्यक्ती तिच्या शेजारी असलेल्या ताटातून एक रोटी घेते. ती एका भांड्यात कुस्करून टाकते. त्यात दही टाकते आणि थोडी भाजी मिक्स करून खायला देते. इथपर्यंत सगळं ठिक आहे मात्र विक्रेता अस्वच्छ ठिकाणी खाली जमिनीवर विक्रीसाठी बसला आहे. तिथं माश्या फिरत आहेत. ज्या हातांनी तो रोटी कुस्करतो ते हातही मळके झाले आहेत. मात्र हे खाणारा कोणतीही तक्रार न करता हे खाताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> चिमुकलीने घेतली गाईची मुलाखत; प्रश्न विचारताच समोरूनही आला असा रिप्लाय, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
नेटकरी संतापले
kpfooddiaries.official_नावाच्या एका इंटरनेट वापरकर्त्याने पाकिस्तानमधील एका स्ट्रीट फूड विक्रेत्याचा नाश्ता तयार करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. पोस्ट केल्यापासून या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊसच पडला आहे. हा व्हिडीओ काही दिवसातच खूप जास्त ट्रेंड होऊ लागला आहे. हा असा मेकिंगचा व्हिडीओ पाहिल्यानंतर इंटरनेट यूजर्स संतापले आहे. कॅप्शनमध्ये वापरकर्त्याने विचारले, स्वच्छता न पाळता इतरांच्या आरोग्याशी खेळू नका, हँडग्लोज घाला. अनेकांनी उलटी करणारा इ मो जी टाकला आहे.अशा विविध प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd