Pakistan Student Answer Sheet: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा परीक्षांशी संबंधित गोष्टीही सोशल मीडियावर व्हायरल होतात. मुलांच्या उत्तरपत्रिकेत त्यांची गमतीशीर उत्तरंही समोर येतात, असंही दिसून येतं. नुकतीच एक उत्तरपत्रिका व्हायरल झाली आहे, जी वाचून तुम्ही पोट धरून हसाल. आतापर्यंत तुम्ही बिहारमधील अनेक मुलांच्या व्हायरल उत्तरपत्रिका पाहिल्या असतील. पण, आता पाकिस्तानातील एका मुलाची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पेपरमध्ये कोणता प्रश्न विचारला होता आणि उत्तरात काय लिहिले होते ते जाणून घ्या…
परीक्षेच्या कॉपीमध्ये विद्यार्थ्यानं काय लिहिले?
परीक्षा म्हटली की काही विद्यार्थ्यांच्या पोटात भितीनं गोळा येतो. कारण ही मुलं वर्षभर काही अभ्यास करत नाही आणि परीक्षेच्या आधी मिळेल त्या नोट्स घेऊन पाठांतर करू लागतात. व्हायरल व्हिडीओमध्ये शिक्षक पेपर तपासताना सांगतात की, ते कराची बोर्डाचा भौतिकशास्त्राचा प्रथम वर्षाचा पेपर तपासत आहेत. हा व्हिडीओ उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांनीच शूट केलाय. यानंतर ते पेपरमध्ये लिहिलेले प्रश्न आणि उत्तरे दोन्ही दाखवतात. उत्तरपत्रिकेत लिहिलेला प्रश्न होता, ‘न्यूटनच्या रिंगची मध्यवर्ती रिंग गडद का आहे, कारण सांगा? याच्या खाली मुलाने प्रश्नाचे उत्तर लिहिले होते. विज्ञान शाखेतून पदवीधर होऊ इच्छिणाऱ्या फर्स्ट ईयरच्या विद्यार्थ्याने उत्तरात पहिली गोष्ट लिहिली, “खूप कठीण पेपर दिला आहे. यानंतर त्याने “मेरी जान मैंने तुझे देखा हस्ते हुए गालों में”, असं लिहून गाणी लिहायला सुरुवात केली. संपूर्ण पेपरमध्ये त्याने असे गाणे लिहिले आहे. एवढंच नव्हे तर या गाण्याचा अर्थ आणि निर्मात्यांबद्दलही सविस्तर माहिती लिहिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ येथे पाहा
हा व्हिडीओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @AliZafarsays नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हा व्हायरल व्हिडीओ व्हॉट्सॲपवर पोस्ट करण्यात आला होता.” व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “हा विद्यार्थी केवळ भौतिकशास्त्रातच नाही तर सर्वच विषयात नापास झाला पाहिजे, तो विनोद करत आहे”, असं म्हणत नेटकरी त्याची खिल्ली उडवत आहेत.