Pakistan Teacher Salary: पाकिस्तान काही दिवसांपासून कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना करीत आहे. महागाईमुळे येथील सामान्य लोकांची अवस्था बिकट झाली आहे. नुकतेच पाकिस्तानमधील काळजीवाहू सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. येथील महागाईने सर्व विक्रम मोडीत काढले असून त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. याच परिस्थितीला पाहून आज आपण पाकिस्तानमध्ये शिक्षकांना किती पगार मिळतो, याबद्दल जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये अजुनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. या देशातील गरिबांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. गेल्या आर्थिक वर्षात गरीबी वाढून ३९.४ टक्क्यांवर पोहोचली आहे, असा इशारा जागतिक बँकेने पाकिस्तानला दिला आहे. मग येथील सरकारी शाळेतील शिक्षकांना पगार किती मिळतो, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच ना…! चला तर पाहूया रिपोर्ट काय सांगते…

पाकिस्तानातील शिक्षकांचा पगार किती?

आज पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्याच्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे तो आपल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देऊ शकत नाही. देशातील लोकांना खायला अन्न मिळत नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानातील शिक्षकाचे सरासरी पगार २४ हजार पाकिस्तानी रुपये आहे. पगार, कंपन्या आणि नोकऱ्यांबाबत अपडेट देणाऱ्या वेबसाइट ग्लासडोरनुसार, पाकिस्तानमध्ये शिक्षकांचे सरासरी वेतन दरमहा PKR ५९,००० (पाकिस्तानी रुपये) आहे.

पाकिस्तानमधील शिक्षकासाठी सरासरी अतिरिक्त रोख भरपाई २४,००० PKR असल्याची माहिती आहे. हा पगाराचा अंदाज पाकिस्तानमधील शिक्षक कर्मचार्‍यांनी Glassdoor ला अज्ञातपणे सादर केलेल्या ६३१ वेतनावर आधारित आहे. 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan teacher salary how much money do government school teachers get in pakistan pdb