पाकिस्तानातील आर्थिक स्थिती दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत आहे. याठिकाणी लोकांची दोन वेळच्या अन्नासाठी मारामार आहे. अन्नाचा तुटवडा आणि त्यात वाढत्या महागाईने पाकिस्तानी जनता त्रस्त झाली आहे. अलीकडे पाकिस्तानातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यात पाकिस्तानी पीठासाठी भांडताना दिसत होते. या व्हिडीओतून पाकिस्तानातील महागाई किती गगनाला भिडलीय याचा अंदाज तुम्हाला आला असेल. अशात पाकिस्तानातील आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला धक्काच बसले. व्हिडीओमध्ये रस्त्यावर बसून काही भिकारी नोटा मोजत असल्याचे दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भीक मागून कमावले एवढे पैसे?

पाकिस्तानमध्ये पदवीधारांपेक्षा भिकारी अधिक कमाई करत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, स्वत:ला भिकारी म्हणवून घेणारे अनेक तरुण रस्त्यावर बसून पैसे मोजत आहेत. यात प्रत्येकजण रस्त्यावर बसून प्लास्टिकच्या पिशवीतील नोटा काढून त्या मोजण्यात व्यस्त आहे. हा व्हिडीओ अनेकांना आश्चर्यचकित करणारा आहे. कारण व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना वाटतेय की, पाकिस्तानात डिग्री घेतलेल्या तरुणापेक्षा रस्त्यावर भीक मागणारा व्यक्ती खूप पैसा कमावतोय. परंतु हा व्हिडीओ खरचं पाकिस्तानचा आहे का याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही, त्यामुळे हा व्हिडीओ खरचं पाकिस्तानचा असल्याचा दावा आपण करु शकत नाही. पण ट्विटरवर ज्या युजरने हा व्हिडीओ शेअर केला त्याने पाकिस्तानचा असल्याचा उल्लेख केला आहे.

ट्विटरवर CCTV IDIOTS या युजरने आपल्या अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, पाकिस्तानातील भिकारी पदवीधारकांपेक्षा जास्त पैसे कमवत आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेट करत लिहिले की, काही फरक पडत नाही. आम्ही वाचलो आहे आणि अजून वाचू. तर दुसऱ्या एका युजरने कमेंट करत लिहिले की, ते फक्त भीकचं मागत नाही, तर अशी काही छोटी-मोठी काम करतात ज्यातून त्यांना पैसा मिळतो.