Shocking video pakistan: पाकिस्तानमधील एक संतापजनक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये सासऱ्याने त्याच्या सुनेला बेदम मारहाण केलीय. या मारहाणीचं कारण म्हणजे सुनेनं उशिरा जेवण दिलं. तिला अक्षरश: लाथा-बुक्यांनी मारहाण करण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानच्या शेखुपुरा येथील असल्याचं म्हटलं जात असून, सध्या सोशल मीडियावर तो व्हायरल होत आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहे. चूल आणि मूल यापलीकडे महिलांनी मजल मारली आहे, असं आपण म्हणतो. मात्र, तरीही अशा घटना आजही पाहायला मिळतात.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ती व्यक्ती महिलेला निर्दयीपणे मारहाण करीत आहे, अक्षरश: तो तिला लाटण्याने डोक्यात, तर कधी हात व पायांवर कसाही मारत आहे. यादरम्यान आणखी एक दिसणारं चित्रही काळीज पिळवटून टाकणारं आहे आणि ते म्हणजे त्या महिलेची लहान मुलं त्या व्यक्तीला म्हणजेच त्यांच्या आजोबांना मारू नका, मारू नका म्हणून रोखण्याचा वृथा प्रयत्न करीत आहेत. तरीही ती व्यक्ती लहान मुलांना ढकलत त्या महिलेला वारंवार मारत आहे. मात्र, तिथेच उभी असणारी दुसरी महिला त्या महिलेल्या वाचवण्याचा प्रयत्न करायचं सोडून हे सगळं ढिम्मपणे पाहत उभी आहे. हा व्हिडीओ पाहणारे सर्वच जण संताप व्यक्त करीत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “प्लीज मला बाहेर काढा” लिफ्टमध्ये चिमुकलीचा हात जोडून आक्रोश; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. हा व्हायरल व्हिडीओ @SheikhNabeel786 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, तो व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनीही वेगवगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत पाकिस्तानमधील संस्कृतीवर टीका केली आहे.