Pakistan viral video: शेजारी देश पाकिस्तान आपल्या विचित्र गोष्टींसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या दरम्यान अर्थव्यवस्था ढासळलेल्या पाकिस्तानचा एक कारनामा पुढं आला आहे. यावेळी पाकिस्तान सरकारने नाही तर तेथील नागरिकांनी हा कारनामा केला आहे. या घटनेमुळे पाकिस्तानची संपूर्ण जगात नाच्चकी झाली आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही म्हणाल असे काय झालं ? तर ऐका…पाकिस्तानातील कराची येथे उद्घाटनाच्या दिवशीच एक शॉपिंग मॉल लुटला गेल्याची घटना समोर आली आहे. ड्रीम बाजार’ नावाच्या स्टोअरच्या उद्घाटनाचं सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रमोशन करण्यात आलं होतं. या दुकानातील प्रत्येक वस्तूची किंमत पाकिस्तानच्या ५० रुपयांपेक्षा कमी होती. एवढी कमी किंमत असूनही पाकिस्तानातील लोकांना ती परवडत नव्हती की काय, म्हणून पाकिस्तानी लोकांनी अवघ्या ३० मिनिटात हे दुकान लुटलं.
पाकिस्तान देश बऱ्याचंदा आपल्या विचित्र कारनाम्यांमुळे चर्चेत येतो. बऱ्याचंदा तिथले लोकं असं काही करतात की ज्यामुळे पाकिस्तानची खिल्ली उडवली जाते. यावेळी पाकिस्तानचा असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे की, जो पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. उद्घाटन समारंभात प्रत्येक वस्तू ५० रुपयांना विकण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर येथे एवढा जमाव जमला की ते अनियंत्रित झाले आणि गर्दीतील लोकांनी या गोंधळाचा फायदा घेत दुकानातच लुटमार केली.ड्रीम बाजार मॉलचा सोशल मीडियावर जोरदार प्रचार करण्यात आला होता. तेथे लोकांना कपडे, इलेक्ट्रिक उपकरणे आणि घरगुती वस्तू अगदी वाजवी दरात मिळणार होत्या. अनेक वस्तू स्वस्तात मिळणार असल्याने उद्घाटनच्या दिवशीच हजारो लोकांचा जमाव दुकानाबाहेर जमला होता. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे दुकान व्यवस्थापनाला शक्य झाले नाही. काही वेळातच शेकडो लोकांची गर्दी दुकानात शिरली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हजारो लोक मॉलमध्ये जबरदस्तीने घुसून मॉल मधील वस्तु लूटतांना दिसत आहेत. यावेळी काही लोकांनी कपडे चोरतानाचा व्हिडिओ देखील तयार केले आहेत आणि सोशल मिडियावर देखील अपलोड केले आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो” लेक पोलीस झाल्याचं कळताच वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला; भररस्त्यातला VIDEO व्हायरल
या सर्व घटनेनंतर दुकान मालकाने सांगितले की, “आम्ही ३ वाजता दुकान उघडले आणि ३.३० पर्यंत दुकानातील सर्व सामान चोरीला गेले. आम्ही हे स्टोअर कराचीच्या लोकांच्या फायद्यासाठी उघडले. वर्षभर वस्तूंच्या किमती त्याच राहणार होत्या. पण आम्हाला चांगल्या ओपनिंगऐवजी गोंधळाला सामोरे जावे लागले. आम्ही मेहनत करुन हे दुकान उघडलं होतं. आम्ही आमच्या कुटुंबियांपेक्षा जास्त वेळ इथे दिला. मात्र लोकांनी आम्हाला अशी वागणूक दिली. पाकिस्तानात खूप कमी जण गुंतवणूक करत आहेत. लोकांच्या हितासाठी जर कुणी काही गुंतवणूक करत तर ते लोकांनी समजून घेतलं पाहिजे.”