Wedding Viral Video: प्रेमाला कुठे बंधन असतं राव.. प्रेमात पडायचं म्हणजे अगदी काहीही कारण पुरतं, हो की नाही? मला त्याचा आवाज आवडला, मला त्याच्या केसाची स्टाईल आवडली, मला तिचे डोळे आवडले इथपासून ते अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही प्रेमात पाडण्यासाठी पुरेश्या ठरतात. असाच काहीसा प्रकार पाकिस्तानच्या या नवदांपत्यासह घडला आहे. लग्नानंतर या नवरीबाईंनी लाजत मुरडत प्रेमात पडण्याचं असं काही कारण सांगितले आहे की जे ऐकून नेटकरी हसून लोटपोट झाले आहेत. नेमकं काय आहे ही प्रेमकहाणी चला तर जाणून घेऊयात..
अलीकडेच एका पाकिस्तानी महिलेने आपल्या ड्रायव्हरला प्रेमाची कबुली दिली. मंडळी मुळात ड्रायव्हरवर प्रेम करणे यात गैर काहीच नाही, पण या महिलेने प्रेमात पडण्यासाठी जे कारण सांगितले ते मात्र भन्नाट आहे. यातील महिला ही खरंतर एक १७ वर्षाची तरुणी आहे तर ड्रायव्हर नवरोबा २१ वर्षांचे आहेत.
इंडिया टाइम्सच्या हवाल्याने व्हायरल होणाऱ्या या प्रेमकथेतील पाकिस्तानी महिला एका सधन कुटुंबातील आहे. साधारणतः लग्न करताना आर्थिक बाजू तोलामोलाची असेल असा प्रत्येकाचा मानस असू शकतो पण प्रेमाला हे बंधन नाही. ही महिला सांगते की “माझा पूर्व ड्रायव्हर व आताचा प्रियकर मला गाडी शिकवायला यायचा कार चालवताना त्याने ज्या प्रकारे गिअर बदलले ते बघूनच मी त्याच्यावर भाळले. मला त्याच क्षणी त्याचा गिअर बदलणारा हात धरवासा वाटला पण मी आता माझ्या प्रेमाची कबुली देत आहे.”
दरम्यान, महिलेला तिच्या पतीला एक गाणे समर्पित करण्यास सांगितले असता तिने त्यांच्या प्रेमकथेनुसार ,’हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए’. हे गाणे समर्पित केले. यावर हसून तिच्या पतीने आता चावी पण हरवली व गाडीपण हरवली असेही उत्तर दिले आहे.
Video: बाई जीव वाचव आणि पळ.. नवरदेवाने भरमंडपात केलेली ‘ही’ धुलाई पाहून नवरीची तुम्हालाही दया येईल
व्हायरल वृत्तानुसार या व्हिडिओमधील पती आता ड्रायव्हर नसून त्याने बायकोच्या वडिलांच्या मदतीने व्यवसाय सुरु केला आहे. तुम्हाला ही प्यार वाली लव्ह स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा.