Pakistani Actress Dance Viral Video : प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटानं सिनेविश्वात धुमाकूळ घातला. लोकप्रिय अभिनेता रामचरण आणि जूनियर एनटीआरच्या अप्रतिम अभिनयामुळं हा चित्रपट प्रचंड गाजला. इतकच नव्हे तर ‘नाटू नाटू’ गाण्यानेही प्रेक्षकांना प्रचंड वेड लावलं. आरआरआर चित्रपट तमाम सिनेचाहत्यांच्या गळ्यातील ताईतच बनला. भारतात हा चित्रपट चमकलाच पण आता पाकिस्तानमध्येही या चित्रपटाचा बोलबाला सुरु झालाय. कारण पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर ‘नाटू नाटू’ गाण्यावर थिरकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

एका लग्नसोहळ्यात आरआरआर चित्रपटातील लोकप्रिय गाणं नाटू नाटू डीजेवर लावण्यात आलं. गाण्याचे बोल सुरु होताच हानिया आमिर भर लग्नमंडपात थिरकली. गोल्डन शरारा सूट घालून हानियाने उपस्थित सर्व पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतलं. जबरदस्त हुक स्टेप करुन हानियाने वऱ्हाड्यांच्या भुवया उंचावल्या. एव्हढच नाही तर व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर आता नेटकरीही हानियाच्या डान्स पाहून वाहवा करु लागले आहेत. हानियाने या गाण्यावर ठुमके मारायला सुरुवात केल्यावर एका तरुणानेही तिला चांगला प्रतिसाद दिला. हानियासोबत त्या तरुणानेही जबरदस्त डान्स केल्याचं व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

नक्की वाचा – Video : सिक्स पॅकसाठी कंबर कसतेय ती तरुणी, पण अरमान मलिक का होतोय पुन्हा ट्रोल? पाहा व्हिडीओ

इथे पाहा व्हिडीओ

हानियाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सुंदर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “तुम्ही खूपच सुंदर डान्सर आहात.” तसंचे नेटकऱ्यांनी हार्ट इमोजी पाठवून हानियाच्या डान्सला पसंती दर्शवली आहे. रामचरण आणि जूनियर एनटीआर यांच्या नाटू नाटू गाण्याला ऑस्कर २०२३ च्या सर्वश्रेष्ठ मूळ गाण्याच्या सीरिजमध्ये ठेवण्यात आलं होतं. या गाण्याचे किलर मूव्ज अनेक कलाकारांनी आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर सादर केल्याचे व्हिडीओही समोर आले आहेत. या आरआरआर चित्रपटाला संपूर्ण सिनेविश्वातून उदंड प्रतिसाद मिळाला.

Story img Loader