ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने चांगली कामगिरी करणे सुरूच ठेवले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारतीय संघ सुपर-१२ मध्ये आतापर्यंत पाच सामने खेळला आहे. ज्यामध्ये भारताने पाकिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेशचा पराभव केला आहे. भारताचा पुढील सामना झिम्बाब्वेशी होणार असून यासोबतच उपांत्य फेरीत भारताचा सामना कोणत्या संघासोबत होणार हेही ठरणार आहे. पण या सामन्याबद्दल पाकिस्तानी अभिनेत्री सहर शिनवारीने एक ट्वीट केले आहे जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री सहर शिनवारीने एक विचित्र ट्वीट केले

पाकिस्तानी अभिनेत्री शिनवारी सहरने सोशल मीडियावर भारत-झिम्बाब्वे सामन्याबद्दल ट्वीट केले आहे. ज्याची खूप चर्चा होत आहे. सहरने ट्वीट करून लिहिले आहे की, जर झिम्बाब्वे संघाने पुढच्या सामन्यात भारताला हरवले तर मी झिम्बाब्वेतील कोणत्या तरी मुलाशी लग्न करेन. सहर शिनवारीचे हे ट्वीट सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर खूप व्हायरल होत आहे.

( हे ही वाचा: अबब! अजगराने फक्त काही सेकंदात हरीणाला संपूर्ण गिळले; Viral Video पाहून तुमचाही थरकाप उडेल)

( हे ही वाचा: Viral Video: मॅडमच्या शेजारी उभा राहून बोलत होता कविता अन् तितक्यात निसटली पँट; आणि मग…)

पाकिस्तानी अभिनेत्री सहार अनेकदा तिच्या ट्वीटमुळे चर्चेत असते. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ती सतत प्रार्थना करत होती की या सामन्यात भारत हरेल. या सामन्यात एवढा पाऊस पडावा, की उपांत्य फेरी भारताने गाठू नये अशी ती प्रार्थना करत होती. मात्र तिची ही प्रार्थना फळाला मिळाली नाही आणि भारताने जबरदस्त सामन्यात बांगलादेशचा ५ धावांनी पराभव केला. बांगलादेशच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani actress says will marry zimbabwean guy if they beat india in ind vs zim t20 world cup gps