Pakistan Viral video: आपल्याला माहिती आहे की, पाकिस्तान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतो. कधी महागाईमुळे तर कधी आपल्या विचित्र कारनाम्यांमुळे तो चर्चेत येत असतो. आता पाकिस्तानातील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमचीही झोप उडेल. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून खराब आहे. देशातील गरिबीच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. एकीकडे लोकांना खायला मिळत नाही, तर दुसरीकडे पैशांच्या उधळपट्टीचे एक असे प्रकरण समोर आले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
एका भिकारी माणसाची पार्टी म्हणताच तुमच्या डोळ्यांसमोर काय चित्र उभं राहिलं असेल? तर एखादा स्वस्तातला केक आणि स्नॅक्समध्ये वेफर किंवा चिवडा वाटला असेल. पण अहो, या भिकाऱ्यानं तर पार अंबानी किंवा अदानी लेव्हलची पार्टी दिली. हो, पाकिस्तानातील एका भिकारी कुटुंबाने आपल्या आजीच्या मृत्यूच्या ४० व्या दिवशी तब्बल २० हजार भिकाऱ्यांसाठी मेजवानी आयोजित केली होती. यासाठी १.२५ कोटी पाकिस्तानी रुपये खर्च केले गेले. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. ही खास मेजवानी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
भीक मागून पोट भरणाऱ्यांकडे असे किती पैसे असू शकतात? काही लाख रुपये असतील तर आश्चर्य वाटणारच! पाकिस्तानातील एका भिकाऱ्यानं असाच एक आश्चर्याचा धक्का सर्वांना दिला आहे. पाकिस्तानातील एका भिकाऱ्यानं सुमारे २० हजार लोकांना जेवायला घातलं. इतक्या लोकांची ने-आण करायला त्यानं दोन हजार गाड्यांची सुविधाही दिली होती. इतकं सगळं करणाऱ्या त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भीक मागून होतो हे विशेष. त्या कुटुंबाने जेवणासाठी मेन्यूही तयार केला होता. त्यात सिरी पाये, मुरब्बा, मांसाहारी पदार्थ असे अनेक पारंपरिक पदार्थ होते. तसंच रात्रीच्या जेवणासाठी मटण, नान मटर गंज (गोड भात) आणि अनेक प्रकारच्या मिठाया होत्या. इतक्या सगळ्या निमंत्रितांसाठी २५० बोकड कापण्यात आले होते.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> मुंबईकरांचा नाद नाय! दादर स्टेशनवर भर गर्दीत १ सेकंदात बदलला प्लॅटफॉर्म; खतरनाक जुगाडचा VIDEO एकदा पाहाच
एका भिकाऱ्याने हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच्याकडे इतके पैसे कुठून आले, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, या घटनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. व्हायरल व्हिडीओवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी कुटुंबाचे कौतुक केले, तर काहींनी त्यांच्या आर्थिक प्रामाणिकतेबद्दल प्रश्न उपस्थित केले. एका वापरकर्त्याने विनोदी कमेंट केली, “हा भिकारी माझ्यापेक्षा श्रीमंत आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने पोस्टमध्ये लिहिले, “मला आता भिकारी समुदायात सामील व्हावे लागेल.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “माझा यावर विश्वास बसत नाही”, अशी खिल्ली उडवली.