आपल्या निळ्या डोळ्याने पाकिस्तानच काय पण भारतातील मुलींना घायळ करणा-या पेशावरमधल्या चहावाल्याचा रंगलेल्या चर्चेप्रमाणे मॉडेलच्या रुपातील लूक समोर आला आहे. चहाच्या गाड्यावर अस्थावेस्थ कपड्यात दिसलेला चायवाला आपल्या नव्या लूकमध्ये स्टाईलिश कपडे घालून आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर अर्शद खान नावाच्या पाकिस्तानी चहावाल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तामधल्या जीया अली या छायाचित्रकार तरुणीने पेशावरमधील इतवार बाजारात चहा विकणा-या अर्शद खानचा फोटो इन्टाग्रामवरुन शेअर केला होता. निळ्या डोळ्यांच्या या अर्शदनने पाकिस्तानीच काय पण सोशल मीडियावरच्या अनेक मुलींना भुरळ पाडली होती. दिवसभर सोशल मीडियावर तो चांगलाच चर्चेत राहिला होता. इतकेच काय पण त्याचे नाव आणि ‘चहावाला’ हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंडिगमध्ये ही दिसले. काहींनी तर त्याची तुलना बॉलीवूडच्या कलाकारांशी देखील केली. अर्शदच्या रुपाची चर्चा रंगल्यानंतर पाकिस्तानमधील ‘फिट इन’ या ऑनलाइन वेबसाईटने त्याला मॉडेलिंगची ऑफर देऊ केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा