पाकिस्तानी फलंदाज अहमद शहजादला पाकिस्तानचे काही चहाते पाकचा विराट कोहली म्हणतात. याचाच आधार घेऊन पाकिस्तानमधील एका ट्विटर अकाऊण्टने कोहली आणि अहमदची तुलना करत तुम्हाला कोण आवडतो असे नेटकरांनाच विचारले. दोघांचे बाजूबाजूला फोटो पोस्ट करुन त्याबरोबर ‘अहमद शहजाद आवडत असेल तर रिट्वीट करा आणि कोहली आवडत असेल तर ट्विट लाइक करा’ असा मजकूर पोस्ट करण्यात आला. पाकिस्तानी चाहत्यांनीही ऑफ फिल्ड जास्त चर्चेत असणाऱ्या अहमद शहजाद ऐवजी प्रतिस्पर्ध्यांना मैदानात गारद करणाऱ्या विराटच्या पारड्यात मते टाकली. या ट्विटला ३२२ रिट्विट मिळाले म्हणजे केवळ ३२२ जणांनी अहमद शहजादला पसंती दर्शवली तर कोहलीच्या पारड्यात पडलेल्या मतांची संख्या होती ६ हजार ४५८! पाकिस्तानमध्ये इतकी लोकप्रियता असणारा कोहली हा धोनीनंतरचा सध्याचा एकमेव भारतीय खेळाडू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोहलीच्या शैलीचे आणि खेळाचे पाकिस्तानमध्ये असंख्य चहाते आहेत हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघ विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन सामन्यांदरम्यानही “कोहली आणि धोनी तुम्ही पाकिस्तानमध्ये येऊन आमच्या संघाविरुद्ध खेळावे अशी आमची इच्छा आहे.” “कोहली, धोनी आम्ही तुम्हाला मीस करतोय.” असे असंख्य पोस्टर्स कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. भारतीय संघ ज्याप्रकारे खेळतोय आणि प्रत्येक खेळाडूची कामगिरी ज्याप्रकारे दिवसोंदिवस उंचावत आहे तशी त्यांच्या चाहत्यांची संख्या जगभरात वाढतेय याचेच हे उदाहरण आहे.
THIS IS SO DISRESPECTFUL TO VIRAT KOHLI
— Maryam (@BefourMaryam) September 12, 2017
you can’t even write @iamAhmadshahzad name next to Virat Kohli. Ahmad Shahzad is useless and selfish cricketer and Kohli is Cricket.
— Iqama Holder (@wasafahmad) September 13, 2017