Pakistani Crowd Dance For Narendra Modi Victory: लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. अशातच आता लाइटहाऊस जर्नालिज्मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला व्हिडीओ आढळून आला ज्यामध्ये काही लोक भाजपाच्या झेंड्यासह आनंदोत्सव साजरा करताना आणि नाचताना दिसत आहेत. पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हा व्हिडिओ पाकिस्तानमधील बलुचिस्तानचा आहे, जिथे लोक नरेंद्र मोदींच्या विजयाचा आनंद साजरा करत आहेत. यासंदर्भात केलेल्या तपासात हा व्हिडीओ खरा असूनही त्यातील काही गोष्टी या चुकीच्या पद्धतीने समोर आणल्या जात असल्याचे समजले आहे. नेमका हा व्हिडीओ कुठला आहे हे पाहूया..
काय होत आहे व्हायरल?
X यूजर @Principalrashtr ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही व्हिडीओ डाउनलोड करून आणि कीफ्रेम मिळवल्या व InVid टूलमध्ये अपलोड करून तपास सुरू केला. त्यानंतर आम्ही या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च सुरू केला. अनेक फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च चालू असताना आम्हाला भाजप जम्मू आणि काश्मीरच्या X हँडलवर एक व्हिडीओ सापडला.
या व्हिडीओतील व्हिज्युअल्स व्हायरल व्हिडीओसारखेच होते आणि व्हिडीओ २०१९ मध्ये पोस्ट करण्यात आला होता.आम्हाला व्हिडिओमध्ये एक घोषणाही ऐकायला आली ज्यात लोक ‘सोफी साहब कदम बढाओ’ असं ओरडताना ऐकू आले. भाजपच्या हँडलने केलेल्या पोस्टमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, व्हिडीओमध्ये सोफी युसूफ यांच्यासह समर्थक दिसत आहेत. भाजपच्या सोफी युसूफनेही आपल्या एक्स हँडलवर व्हायरल व्हिडीओ शेअर केला होता.
पाच वर्षांपूर्वी काश्मीर न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या एका व्हायरल व्हिडीओचे व्हिज्युअल आम्हाला आढळले.
आम्हाला आशिया न्यूज नेटवर्कच्या वेबसाइटवर सोफी युसुफने २०१९ मध्ये नामांकन दाखल केल्याची बातमी देखील दिसली.
हे ही वाचा<< ओवेसींच्या नव्या Video ने निकालाच्या दिवशी खळबळ; नरेंद्र मोदींचं नाव घेत व्यक्त केली मोठी आशा, दुसरी बाजू पाहिलीत का?
निष्कर्ष: जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनागमध्ये उमेदवारी दाखल करण्यासाठी सोफी युसूफ यांच्यासह आलेल्या समर्थकांचा जुना व्हिडिओ पाकिस्तानमध्ये नरेंद्र मोदींच्या विजयाचा आनंद साजरा करत असल्याच्या खोट्या दाव्यांसह शेअर केला जात आहे. व्हायरल दावा खोटा आहे.