9 Ways to Communicate with Indians on Border: भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानातील अनेक व्हिडीओ समोर येत असतात. कधी हे व्हिडीओ तुम्हाला हसवणारे असतात, तर कधी धक्का बसवणारे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. भारत-पाकिस्तानमधील संबंध कितीही तणावपूर्ण असले तरी अनेकदा असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यामध्ये दोन्ही देशांतील सामान्य लोक एकमेकांना कसे प्रेमाने भेटतात, हे स्पष्टपणे दिसून येते. याचा एक प्रत्यय देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सीमेपलीकडून लोक एकमेकांशी कसे बोलतात, हे तुम्हाला यातून दिसेल. पाकिस्तानमधील डॉक्टर मरियम फातिमा यांनी ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डॉक्टर मरियम फातिमा सांगतात की, शांतता वाढवण्याचा हा एक मार्ग आहे. व्हिडीओमध्ये त्याची संपूर्ण झलक दाखवण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहाल की मरियम यांनी सीमेपलीकडे राहणाऱ्या भारतीय लोकांशी कसे बोलायचे याचे नऊ मार्ग सांगितले आहेत.

(हे ही वाचा:ती गळाभेट ठरली शेवटची! स्कूटरवर बसून मित्राबरोबर गप्पा मारताना घडलं असं की… हृदयद्रावक मृत्यू कॅमेऱ्यात कैद)

१. नदीच्या पलीकडे असतानादेखील त्यांच्याकडे आपले हात पुढे करा आणि म्हणा – ‘इथेही या’

२. त्यांना विश्वासात घ्या आणि सांगा आम्ही त्यांच्याबरोबर आहोत.

३. ‘हॅलो म्हणताना हात हलवा’

४. ‘हवेत हात ठेवून त्यांच्यासाठी हृदय बनवा.’

५.’त्यांना पुन्हा पुन्हा मोठ्याने आवाज द्या आणि त्यांच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रियेची वाट पाहा.’

६. त्यांना नदीच्या पलीकडून क्रिकेट खेळण्यासाठी आमंत्रित करा.

७.’तुमचा गायक सिद्धू मुसेवाला आम्हाला किती आवडतो हे त्यांना सांगा.’

८. ‘त्यांना जोरात बोलायला सांगा.’

९.’तुमच्या बोटांनी इशारा करून त्यांना तुमचा फोन नंबर द्या.’

अशाप्रकारे व्हायरल व्हिडीओमध्ये पाकिस्तानी महिलेने सीमेपलीकडील भारतीयांशी बोलण्याचे वरील नऊ मार्ग सांगितले आहेत. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, पाकिस्तानी नागरिक आणि भारतीय एकमेकांशी किती प्रेमळपणे बोलत आहेत. दोन्ही देशांमध्ये कितीही राजकीय समस्या आणि वाद असले तरी लोक एकमेकांचा आदर करताना दिसत आहेत. इन्स्टाग्रामवरही युजर्स या व्हिडीओला खूप पसंती देत ​​आहेत.

येथे पाहा व्हिडीओ

या व्हिडीओला १.८ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंटही करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “लोक एकमेकांवर प्रेम करतात, पण राजकारणीच खरे गुन्हेगार आहेत.” दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे किती मजेदार आणि गोंडस आहे. आशा आहे की लोक मानवतेशी जोडले जातील आणि राजकीय अजेंड्यात अडकणार नाहीत.”

तिसऱ्याने लिहिले आहे, “तुम्हाला एखाद्या भारतीयाला भेटायचे असेल तर दुबईला या. इथे सर्वोत्कृष्ट लोक आहेत. एक पाकिस्तानी असल्याने मी म्हणू शकतो की, माझे भारतीय मित्र इथे खूप चांगले आहेत.” तसे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचं मत काय आहे? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.