पाकिस्तानमधील एका पॅसेंजर ट्रेनचा ड्रायव्हर एका विचित्र कारणामुळे चर्चेत आहे. खरंतर हा ड्रायव्हर ट्रेन चालवत होता, पण तेवढ्यात त्याला दही खाण्याची इच्छा झाली. मग बस काय, ड्रायव्हरने ट्रेन मध्येच थांबवली आणि त्याच्या असिस्टंटला दही खरेदी करायला पाठवले.

व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो, या घटनेशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर ट्रेन चालक आणि त्याच्या सहाय्यकाला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

रेल्वेमंत्र्यांनी केली कारवाई

डॉनच्या वृत्तानुसार, रेल्वे मंत्री आझम खान स्वाती यांनी मंगळवारी ट्रेन चालक राणा मोहम्मद शहजाद आणि त्याचा सहाय्यक इफ्तिखार हुसैन यांना नोकरीवरून काढून टाकले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. व्हिडीओमध्ये ड्रायव्हर दही खरेदी करण्यासाठी लाहोरमधील रेल्वे स्टेशनजवळ ट्रेन थांबवताना दाखवण्यात आले आहे.

( हे ही वाचा: Google Year in Search 2021: यावर्षी भारतीयांनी इंटरनेटवर सगळ्यात जास्त काय सर्च केलं? जाणून घ्या )

“मी भविष्यात अशा घटना खपवून घेणार नाही आणि कोणालाही वैयक्तिक वापरासाठी राष्ट्रीय संपत्तीचा वापर करू देणार नाही,” असा इशारा रेल्वेमंत्र्यांनी एका निवेदनात दिला आहे.सध्या ही घटना समोर आल्यानंतर पाकिस्तान रेल्वे विभागाची चांगलीच बदनामी होत आहे. सोशल मीडियावर यूजर्स पाकिस्तानी रेल्वेची खिल्ली उडवत आहेत.

( हे ही वाचा: कुत्र्याची तहान शमवण्यासाठी चिमुरड्याने लावली ताकद, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक )

हे लक्षात घेण्यासारखे आहे की याआधी डिसेंबरमध्ये रेल्वेने प्रवासादरम्यान लोकोमोटिव्ह चालक आणि सहाय्यक चालकांना मोबाईल फोन वापरण्यास बंदी घातली होती. त्यांना सर्व गाड्यांमध्ये (प्रवासी आणि सामान) सेल्फी घेण्यास, त्यांच्या फोनवर व्हिडीओ आणि ऑडिओ संदेश रेकॉर्ड करण्यास देखील मनाई करण्यात आली होती. संबंधित विभागीय प्रमुखांना ट्रेनच्या क्रू मेंबर्सवर (विशेषत: ड्रायव्हर आणि त्यांचे सहाय्यक) लक्ष ठेवावे आणि कोणी आदेशाची पायमल्ली करत असल्यास तत्काळ कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Story img Loader