Pakistani Family’s Heartwarming Marathi-Style Haldi Ceremony : पाकिस्तानमध्ये एका कुटुंबाने मराठमोळ्या पद्धतीने हळद सोहळा साजरा केला आहे. होय, तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. पाकिस्तानमध्ये मराठी पद्धतीने हळदीचा सोहळा पार पडला. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण पाकिस्तानमध्ये काही मराठी कुटुंब राहतात. या आधी पाकिस्तानमधील वडापाव विकणाऱ्या जोडप्याचा व्हिडिओ चर्चेत आला होता. त्यानंतर पाकिस्तानमध्ये गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जात असल्याचे व्हिडिओ देखील समोर आले. पाकिस्तानमध्ये स्थायिक असलेले मराठी कुटुंब आजही आपल्या मुळ परंपरा जपत आहे. याचीच प्रचिती देणारा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या हृदयस्पर्शी व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
एका कुटुंबाने अलीकडेच इंस्टाग्रामवर त्यांच्या हळदीच्या सोहळ्याची खास व्हिडिओ पोस्ट केला आहे जो सध्या व्हायरल होत आहे. त्याला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.
पाकिस्तानी कुटुंबाचा महाराष्ट्रीयन पद्धतीने हळदीचा सोहळा
इंस्टाग्रामवर theamarparkash आणि sush.parkash नावाच्या कुटुंबाने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, हे जोडपे अतिशय उत्साहाने आणि आनंदाने हळदीचा सोहळा साजरा करत आहे. सोहळ्यामध्ये त्यांचे मित्र आणि कुटुंब देखील उपस्थित असल्याचे दिसत आहे. पारंपारिक मराठीमोळ्या पद्धतीने हळद साजरी केली जात आहे ज्यामध्ये नवरीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे आणि पांरपारिक मराठमोळे दागिने गळ्यात घातले आहे. नवरदेवाने पांढरा कुर्ता परिधान केला आहे. नवरा नवरी आधी मराठमोळ्या गाण्यावर नाचताा दिसत आहे. त्यानंतर नवरी पिवळ्या रंगाची साडी नेसते आणि त्यानंतर पारंपारिक पद्धतीने तिला महिला हळद लावतात. नवरीच्या कपाळावर कुंक लावून त्यावर तांदुळ लावले जातात. तिला पांरपांरिक मुंडवळ्या बांधल्या जातात. त्यानंतर नवरा नवरी एकमेकांना हळद लावतात आणि नाचताना दिसत आहे. हा सर्व सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
नेटकरी काय म्हणाले?
पाकिस्तानमध्ये राहात असूनही, या जोडप्याचे त्यांच्या सांस्कृतिक वारशाप्रती असलेले प्रेम आणि वचनबद्धतेचे नेटकऱ्यांनी कौतुक केले. अनेक वापरकर्त्यांनी व्हिडिओवर कमेंट करत म्हटले की, जय महाराष्ट्र असे म्हटले. तर काहींनी म्हटले की, “पाकिस्तानमध्ये महाराष्ट्राची संस्कृती जपली जात आहे हे पाहून छान वाटले.”
आणखी एकाने कमेंट केली की, “खूप खूप सुंदर दिसतेय नवरीबाई…नजर ना लागो…?मस्त मराठी आपल्या महाराष्ट्रीयन रूढी परंपरा जपल्या आहात…हिरवा चुडा..पिवळी साडी आणि साज शृंगारने चार चांद लावलेत नवरीच्या सौंदर्यात… नांदा सौख्यभरे..”
दुसरा म्हणाला की,” महाराष्ट्रीयन नवरी नेहमीच सुंदर असतात, तूही खूप सुंदर दिसतेस ताई.”