CCTV installs on Daughters Head: मुलींवर होणारे अत्याचार हा आजचा कळीचा मुद्दा आहे. भारत किंवा जगातील कोणतेही देश असो, मुलींच्या सुरक्षेसाठी पालक चिंतित असल्याचे दिसतात. पाकिस्तानमधील एका वडिलांनी मात्र यावर अनोखी शक्कल लढवली आहे. या वडिलांनी आपल्या मुलीच्या डोक्यावरच सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे. इंग्रजी वृत्त संकेतस्थळांनी याचे नामकरण देऊन याला शी’सीटीव्ही असे उपहासाने म्हटले आहे. या घटनेचा व्हिडीओ आता जगभरात व्हायरल झाला असून सदर मुलीनेच तिच्या वडिलांच्या कृत्याबाबत माहिती दिली आहे.

एक्स आणि इतर सोशल मीडिया साईटवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक मुलगी डोक्यावर भलामोठा कॅमेरा लावलेली दिसत असून ती वृत्तावाहिनीशी बोलताना त्या कॅमेऱ्यामागची कहाणी सांगते. जेव्हा या कॅमेऱ्याबाबत तिला प्रश्न विचारला गेला, तेव्हा ती म्हणाली की, माझ्या वडिलांनी हा कॅमेरा बसविला आहे. मी कुठे जाते, हे पाहण्यासाठी आणि सुरक्षेसाठी त्यांनी गा कॅमेरा बसविला आहे. अनेकांना ही युक्ती अजब किंवा अतिशयोक्ती वाटू शकते. पण माझ्या वडिलांच्या कृत्याबाबत माझी कोणतीही तक्रार नाही.

Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rishi kapoor was scared of raj kapoor
वडील घरी आले की घाबरून लपायचो, ऋषी कपूर कारण सांगत म्हणालेले, “ते खोलीत…”
mukta barve entry in colors marathi serial
Video : ‘कलर्स मराठी’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत मुक्ता बर्वेची एन्ट्री! जबरदस्त लूक अन् प्रोमोने वेधलं लक्ष
marathi actress amruta Deshmukh share brother abhishek Deshmukh funny video
‘आई कुठे काय करते’मधील अभिषेक देशमुखचा बहिणीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, म्हणाली, “मालिका संपतेय तर मग…”
celebrated Diwali in America for the first time watch video
Video: भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ
alia bhatt diwali yellow saree is plant dyed and recycled from florals
झेंडुच्या फुलांचा असाही पुनर्वापर! आलिया भट्टने दिवाळीला नेसलेल्या साडीत काय आहे खास? किंमत ऐकून व्हाल थक्क

हे वाचा >> Army officers friend gangraped: रात्री भटकंतीला गेलेल्या दोन जवानांवर जमावाचा हल्ला, मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार

पाकिस्तानच्या कराचीमध्ये नुकतेच एका महिलेला हिंसाचारात प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेचा अनेकांनी धसका घेतला असून आपल्या घरातील महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याच्या काळजीतून सदर वडिलांनी हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जाते.

वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सदर मुलगी सांगते की, तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षकाची नोकरी करतात. डोक्यावर बसवलेल्या कॅमेऱ्याचे लाईव्ह फुटेज त्यांना दिसत असते. कराचीमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे माझ्या पालकांना माझ्या सुरक्षेची काळजी होती, त्यातून त्यांनी ही शक्कल लढविली. Next Level Security अशा कॅप्शनने अनेक लोक हा व्हिडीओ शेअर करत आहेत. अनेकांनी ही घटना गमतीने घेतली असली तरी एका बापाची मुलीच्या सुरक्षेबाबतची तळमळ यातून दिसून येत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.