Pakistani Girl Dance Viral Video : पाकिस्तानच्या आयशा नावाच्या तरुणीचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. वेगवेगळ्या गाण्यांवर जबरदस्त ठुमके लगावत लोकांचं मनोरंजन करणाऱ्या आयशाचा इंटरनेटवर गेल्या काही दिवसांपासून बोलबाला सुरु आहे. पण आयशानंतर आता पाकिस्तानच्या दुसऱ्या एका तरुणीनं डान्सचा तडका सुरु केला आहे. गोलियों की रासलीला राम लीला या सिनेमाच्या ‘अंग लगा दे’ या लोकप्रिय गाण्याची या तरुणीला भुरळ पडलीय. नटालीया नावाच्या या डान्सर तरुणीने भन्नाट डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “हिचा डान्स तर सिनेमातील अभिनेत्रींपेक्षाही सुंदर”

मरुन कलरच्या लेहंग्यामध्ये एक तरुणी लग्नमंडपात भन्नाट डान्स करताना या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. तरुणीला जबरदस्त डान्स करताना पाहून आजूबाजूला असलेल्या लोकांच्या भुवया उंचावल्या. नटालीयाने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर एक मिलियनहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तरुणीचा डान्स व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. कारण जमिनीवर झोपून अंग लगा दे या गाण्यावर केलेल्या अफलातून स्टेप्स नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी सुंदर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
dance of women on Zapukzhupuk
‘आरारारा खतरनाक…’ चाळीतल्या महिलांचा झापुक झुपूक गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

नक्की वाचा – Video : बिअर पित एक्स्प्रेसवेवर बुलेटची रायडिंग, Reel व्हायरल होताच पोलिसांनी पठ्ठ्याची नशाच उतरवली

इथे पाहा व्हिडीओ

एका नेटकऱ्या व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देत म्हटलं, “सिनेमातील अभिनेत्रींपेक्षा जबरदस्त डान्स ही तरुणी करताना दिसत आहे.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, ” तू खूप सुंदर आणि मोहक नृत्य सादर केलंय, मी डान्स पाहून खूप इम्प्रेस झालो.” तर अन्य एक नेटकरी म्हणाला, ” तिने केला डान्स अफलातून आहे, ती खूप मस्त आहे,”. ” काय सुंदर डान्सचा नजारा आहे, तिच्याकडे किलर अदा आहेत.”, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं. पाकिस्तानच्या आयशाचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रकाशझोतात आल्यानंतर नटालीयानेही कंबर कसली आहे. नटालीयाने अंग लगा दे गाण्यावर सुंदर डान्स करून तमाम नेटकऱ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

सिनेमातील अभिनेत्रींचा डान्स पाहणं अनेकांना आवडतं. पण आताच्या सोशल मीडियाच्या जगतात रील्स बनवून काही तरुणी भन्नाट डान्स करताना दिसतात. या तरुणींच्या डान्स व्हिडीओंनाही लाखोंच्या संख्येत लाईक्स मिळताना दिसतात. पाकिस्तानच्या आयशाचेही व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाल्याने ती सोशल मीडियावर प्रकाशझोतात आली. सिनेम पाहण्याची आवड असतानाचा आता इंटरनेटवर व्हायरल होणारे व्हिडीओ पाहण्याचा कलही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Story img Loader