Pakistan Girl Dance Video: सध्या सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तसेच विविध व्हिडीओ चर्चेत येत असतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, भयानक, स्टंट, डान्स असे व्हिडीओ समोर येत असतात. नुकताच समोर आलेला व्हिडीओ डान्सचा आहे. अनेकदा हे डान्स इतके सुंदर असतात की, पाहणाऱ्याचंही अंग आपोआप हलायला लागतं. आता हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमचेही होश उडतील. सध्या अशाच एका तरुणीचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामधील तिच्या अदा आणि डान्स स्टेप्सची सर्वांनाच भुरळ पडली आहे. तरुणीने जबरदस्त डान्स करत सर्वांनाच थक्क केलं आहे. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खळबळ उडवत आहे.
असाच डान्सचा एक व्हिडीओ पाकिस्तानमधून समोर आला आहे. हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये मुलीला पाहून प्रत्येक जण तिचा चाहता बनला आहे. लोकांना सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप आवडला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ एका लग्न समारंभातील असल्याचं दिसून येत आहे. या समारंभात श्रेया घोषालच्या झल्लाह वल्लाह या गाण्यावर पाकिस्तानी तरुणी डान्स करताना दिसून येत आहे. या गाण्यावर तरुणी आपले एक्सप्रेशन्स अतिशय शानदारपणे दाखवत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला. व्हिडीओ पाहून नेटकरी या तरुणीचे कौतुक करीत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, हिरव्या रंगाच्या सलवार सूटवर स्टेजवर सर्वांसमोर नाचणाऱ्या तरुणीने आपल्या डान्सने सर्वांचे मन जिंकली आहेत. या तरुणीचे क्युट एक्सप्रेशन्स पाहून नेटकरी फॅन झाले आहेत.
(हे ही वाचा : मसाज करणाऱ्याने आपली थूंक क्रीममध्ये मिसळून केली फेस मसाज, किळसवाणा Video व्हायरल, पोलिस आरोपीच्या शोधात )
२०१२ मध्ये अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राचा ‘इशकजादे’ या चित्रपटाचे सुपरहिट गाणे श्रेया घोषाल यांनी गायले होते. त्या गाण्यावर तरुणी नाचताना दिसली. मुलीच्या नृत्याने प्रत्येकाला थक्क केले. हा व्हिडीओ मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर @KumarSahil30 नावाच्या खात्यासह सामायिक केला गेला आहे, जो १०० हून अधिक लोकांनी पाहिला आहे. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.
तरुणीनं असा केला डान्स
सोशल मीडियावर असे नृत्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आतापर्यंत पाकिस्तानातील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. वेगवेगळ्या अकाउंटवरूनही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण मजेशीर प्रतिक्रिया कमेंटमध्ये मांडताना दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.