लग्नानंतर नवदाम्पत्याला पाहुणे मंडळी आणि नातेवाईक काहीतरी गिफ्ट देत असतात, पण लग्नात कोणी गिफ्ट म्हणून एके-47 रायफल दिल्याचं तुम्ही पाहिलंय का? सोशल मीडियावर लग्नाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये एक महिला नवरदेवाला चक्क एके-47 (AK-47) गिफ्ट देताना दिसत आहे.
व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाकिस्तानमधील असून व्हिडिओमध्ये दिसणारी महिला नवरदेवाची सासू असल्याचं सांगितलं जातंय. व्हिडिओमध्ये ही महिला नवरदेवाकडे जाऊन त्याला गिफ्ट म्हणून एके-47 (AK-47) रायफल देताना दिसत आहे. महिलेने दिलेल्या गिफ्टनंतर लग्नात उपस्थित पाहुणेमंडळी आनंदाने कल्ला करत असल्याचा आवाज येत आहे. विशेष म्हणजे AK-47 रायफलसारखं खतरनाक गिफ्ट दिल्यानंतरही उपस्थितांमध्ये कोणालाही आश्चर्य वाटत नाही. नवरदेव किंवा नववधूलाही गिफ्ट बघून धक्का बसत नाही, उलट नवरदेव गिफ्ट बघून हसताना दिसत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या सईद इख्तियार नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्यक्तीने ट्विटरवरील बायोमध्ये आपली ओळख पॉलिटिक्स, जर्नलिस्ट आणि अॅक्टिविस्ट म्हणून लिहिली आहे. व्हिडिओ शेअर करताना सईदने उर्दु भाषेत, ‘अशी सासू असावी’ अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे आणि कोणत्या ठिकाणाचा आहे याबाबत त्याने माहिती दिलेली नाही.
ایسی ساسیں ہونی چاہیے۔۔۔۔ ہمارے جذبات پر بھی غور کیا جاۓ۔۔۔۔۔۔ pic.twitter.com/huSMjH9UGH
— Syed Ikhteyaar (@HussainIkhteyar) November 25, 2020
दरम्यान, लग्नात प्राणघातक हल्ला करणारी रायफल गिफ्ट म्हणून देणं अनोखी गोष्ट असली तरी बंदुकीचा पाकिस्तान आणि भारतासह इतरही अनेक देशांमधल्या विवाहांशी निकटचा संबंध राहिला आहे. विवाहसोहळा आणि इतर उत्सवांमध्ये हवेमध्ये गोळीबार केल्याच्या अनेक घटना नेहमीच कानावर येत असतात.