सध्या सोशल मीडियावर गुरमेहर कौर हे नाव खूपच गाजतंय. दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरूद्ध मोहिम राबवण्यात येत होती, आणि गुरमेहर कौर ही विद्यार्थीनी या मोहिमेचा महत्त्वाचा चेहरा ठरली होती. लेडी श्रीराम कॉलेजमध्ये शिकत असलेली गुरमेहर कौर ही कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन मनदीप सिंग यांची मुलगी आहे. अभाविप विरोधात मोहिमेचा चेहरा बनलेल्या गुरमेहरला बलात्काराच्या आणि मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या, शेवटी या सगळ्याकडे पाठ फिरवत ती जालंधरला आपल्या घरी परतली.

VIDEO : आणखी एक भारतीय ठरली वर्णद्वेषाची बळी

वीरेंद्र सेहवाग आणि योगेश्वर दत्ता याने देखील ट्विट करत गुरमेहरवर टीका केली होती. असे वातावरण तापले असताना सगळ्यांचे लक्ष वळले आहे ते मुळच्या पाकिस्तानच्या असलेल्या फयाज खान याच्याकडे. ”युद्धात कुटुंबातील सदस्य गमावलेल्या अनेक कुटुंबांना मी जवळून पाहिलं आहे, त्यामुळे मी तूझं दु:ख समजू शकतो, पाकिस्तान आणि भारत या दोन्ही राष्ट्रातील नात्याकडे शत्रू म्हणून पाहिले जाते. पण मला मात्र तूझ्यात आणि माझ्यात वेगळं नातं निर्माण करायचे आहे, मी तूला वडिलांचे प्रेम कधीच देऊ शकत नाही पण तूला मोठ्या भावाचे प्रेम मात्र नक्की देऊ शकतो, पाकिस्तानी भाऊ आणि शीख बहिण या नात्याने भारत पाकिस्तानची शत्रू राष्ट्रची ओळख मिटवून भावंडाचं राष्ट्र अशी करू, असा संदेश फयाजने गुरमेहरसाठी लिहला आहे.

VIRAL : असे काय घडले की भिकाऱ्याने देऊ केली आपली कमाई

अभाविपीविरोधात गुरमेहरने जसा व्हिडिओ बनवला होता तसाच व्हिडिओ फयाजने शेअर केला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरूद्ध सुरू असलेल्या मोहिमेत गुरमेहर महत्त्वाचा चेहरा होता, पण धमक्या येऊ लागल्याने तिने माघार घेतली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकजणांनी तिला पाठिंबा दिला.

Story img Loader