काही लोक रोमान्सच्या बाबतीत बॉलिवूडच्या रोमँण्टिक अभिनेत्यांनाही टक्कर देतात. लग्नानंतर जेव्हा पती -पत्नीवर जबाबदाऱ्या येतात, तेव्हा हळूहळू त्यांच्यातील अंतर वाढू लागतं. जरी आपण एकमेकांचा आदर करतो परंतु कधीकधी कुटुंब आणि कामामध्ये संतुलन राखणं खूप कठीण होतं. अशा परिस्थितीत दोघांमधलं प्रेम कधी आटून जातं ते ही कळत नाही. पण लग्नानंतरही नवरा-बायकोमधलं प्रेम कायम राहू शकतं, हे पटवून देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर एक क्यूट स्माईल आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पती आपल्या पत्नीला एका छोटंसं गिफ्ट देऊन सरप्राईज देतो. या व्हिडीओमध्ये ज्या पद्धतीने पत्नी आश्चर्य झाली, त्यासोबतच नेटिझन्स सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडीओमधील पती बाजारातून फळे आणि किराणा घेऊन घरी आल्याचा दिसून येत आहे. बाजारातून आणलेलं सामान घेऊन जाण्यासाठी हा पती आपल्या पत्नीला घराबाहेर बोलवतो. पत्नी आपल्या घराच्या गेटमधून बाहेर येताना दिसते. पती कारमध्येच बसलेला दिसून येत आहे. पत्नी कारजवळ येताच पती तिच्या हातात किराणा सामानाऐवजी छान लाल रंगाचं गुलाबाचं फूल देऊन सरप्राईज देतो. पतीचा हा रोमॅण्टिक अंदाज पाहून पत्नीसुद्धा आश्चर्यचकित होते.

आपल्या पतीने लाल गुलाबाचं फूल दिलेलं पाहून ती लाजून जाते. तिच्या चेहऱ्यावर लाली झळकताना दिसून येते. किती रोमॅण्टिक ना? पतीचं सरप्राईज पाहून हसत पत्नी त्याला म्हणते, “गॅसवर किमा ठेवला आहे…आणि यांचं प्रेम काही संपण्याचं नाव घेत नाही. ती केळी द्या उचलून…”

पाहा व्हिडीओ:

पती-पत्नीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाकिस्तानच्या लाहोरमधला आहे. लाहोरमध्ये राहणारा कंटेंट क्रिएटर बिलाल खान याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यांची पत्नी दुआ सिद्दीकी यांना गुलाब देऊन आश्चर्यचकित केलंय. गेल्या महिन्यात 23 सप्टेंबर रोजी बिलालने हा व्हिडीओ शेअर केला होता. आतापर्यंत या व्हिडीओला १४०,६२४ पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

या व्हिडीओमधील पती आणि पत्नीची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. कपलचं इतकं सुंदर बॉण्डिंग पाहून नेटिझन्सनी या व्हिडीओवर कमेंट्स सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा पाऊस पाडलाय. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani man surprises wife with a cute gift her reaction is now a viral video prp