ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टी२० विश्वचषकात २७ ऑक्टोबरला पाकिस्तानला झिम्बाबेकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. अवघ्या एका धावेने झिम्बाबेने हा सामना जिंकला. या सामन्यानंतर पाकिस्तानचा या विश्वचषकातील प्रवास खडतर असणार आहे. मात्र या सामन्यानंतर वेगळ्याच वादाला तोंड फुटले. वादाला कारण ठरले ते म्हणजे ‘पाकिस्तानी मिस्टर बीन’.

पाकिस्तान विरुद्ध झिम्बाबे सामन्याआधी झिम्बाबेच्या चाहत्याने एक ट्विट केले होते. यामध्ये तो म्हणाला होता, “आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही. एकदा तुम्ही आम्हाला मिस्टर बीन रोवॅनऐवजी खोटा मिस्टर बीन दिला होता. उद्या तुम्हाला पराभूत करुन आम्ही याचा बदला घेणार आहोत. पाऊस पडणार नाही यासाठी प्रार्थना करा.” यानंतर ट्विटरवर ‘PAK Bean’ ट्रेंड होऊ लागले.

२०१६ साली हुबेहूब मिस्टर बीन सारखे दिसणारे पाकिस्तानी कलाकार आसिफ मोहम्मद यांनी एका कार्यक्रमासाठी झिम्बाबेचा दौरा केला होता. या झिम्बाब्वे दौऱ्यामध्ये केवळ मिस्टर बीनप्रमाणे दिसतो या एका कारणासाठी असिफ यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. याबद्दल झिम्बाब्वेच्या नागरिकांच्या मनात राग होता.

जीव वाचवण्यासाठी तब्बल सहा तास फ्रिजमध्ये बसून राहिला अन्…; पाहा नेमकं काय घडलं

दरम्यान, आता या बनावट मिस्टर बीनने झिम्बाब्वेच्या नागरिकांना एक संदेश दिला आहे. यासंबंधीचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये आसिफ मोहम्मद झिम्बाब्वे संघाची प्रशंसा करताना आणि त्यांच्या नागरिकांप्रती प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. यावेळी ते रोवन ऍटकिन्सन यांच्या मिस्टर बीन या पात्राची नक्कल करताना दिसत आहेत. त्यांनी आपल्या व्हिडीओमध्ये ‘आय लव्ह यू झिम्बाब्वे’ असेही म्हटले आहे.

ट्विटरवर @AdamTheofilatos या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत साडेसात लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

झिम्बाब्वेने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष इमर्सन डंबुडझो मनंगाग्वा यांनीही ट्वीटरवरुन आनंद व्यक्त केला. पण त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तानलाही डिवचलं. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, “झिम्बाब्वेला फारच भन्नाट विजय मिळला! संपूर्ण संघाचं अभिनंदन. पुढील वेळेस खरा मीस्टर बीन पाठवा…” असं मनंगाग्वा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं. पाकिस्तानने यापुढे तरी खरा मिस्टर बीन पाठवावा अशी अपेक्षा यावेळी मनंगाग्वा यांनी व्यक्त केली.

हातातच रॉकेट पेटवणाऱ्या टवाळ पोरांना चांगलीच अद्दल घडली! अशी फजिती झाली की…

दरम्यान, झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांच्या या ट्विटमुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ संतापले. त्यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले, “आमच्याकडे खरे मिस्टर बीन नसतील, पण आमच्याकडे खरी क्रिकेट स्पिरिट आहे. आम्हा पाकिस्तानी लोकांना पुनरागमन करण्याची सवय आहे. राष्ट्रपती महोदय, तुमचे अभिनंदन. आज तुमचा संघ खरोखरच चांगला खेळला. “