पाकिस्तानमधील एका कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने अचानक केलेल्या लँडिंगचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओने इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे कारण या नाट्यमय व्हिडिओमध्ये पॅराग्लायडर लँडिंग करताना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्याच्या अंगावर जातो आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल क्लिपमध्ये पाहून शकता की, हवेत उडणारा पॅराग्लायडर पॅराशूटसह लँडिंगच्या तयारीत आहे. त्याच्या पॅराशूटमधून लाल आणि निळ्या रंगाचा धूर येत आहे. पॅराग्लायडर पॅराशूट लँड करण्याच्या तयारीत असताना त्याचा अंदाज चुकतो आणि वेगावरील त्याचे नियंत्रण सुटते तो मैदानावर लँड न करता थेट मैदानाच्या बाजुला पहिल्या रांगेत बसलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या अंगावर जातो. पण पाहुणे तेथून उठून बाजूला होतात त्यामुळे त्यांना कोणतीही दुखापत होत नाही. अनेक लोक त्या अपघातापासून वाचण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसत आहेत. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. ग्लायडर खराब झालेल्या पॅराशूटमध्ये अडकलेला दिसतो. द खलीज टाईम्सच्या मते, ही घटना नोव्हेंबर २०२३ मध्ये गिलगिट-बाल्टिस्तानच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात घडली होती.
या व्हिडिओला २,९०,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानी लोकांना ट्रोल केले. एकाने लिहिले की,”एकही दिवस असा जात नाही जेव्हा पाकिस्तान पाकिस्तानी गोष्टी करत नसेल.” तर दुसरा म्हणाला की, “ए तो स्पायडरमॅन मूव्हीमध्ये ग्रीन गोब्लिनसारखा उतरला.”
हेही वाचा – जीम लावली अन् गर्लफ्रेंड गमावली! पुणेकर तरुणाने Reviewमध्ये सांगितली ब्रेक-अप स्टोरी, Viral Post एकदा बघाच
“त्याला सराव करताना त्याच ठिकाणी उतरवले जाऊ शकते. त्याने त्याच भागात VIP बसण्याची व्यवस्था केली होती…त्याचा दोष नाही!!” तिसऱ्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली. “सामान्य पाकिस्तानी जेव्हा ते ऐकतात की बिर्याणी मोफत वाटली जाते तेव्हा….,” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.