Chandrayaan-3 Update: भारताचं मून मिशन शेवटच्या टप्प्यात आहे, भारत चंद्रावर इतिहास रचण्याच्या अगदी जवळ आहे. भारताचे चांद्रयान-३ येत्या काही तासांत चंद्रावर उतरणार असून, सॉफ्ट लँडिंगनंतर जगात भारताचा दबदबा आणखी वाढणार आहे. कारण रशियाच लूना-२५ चंद्रावर उतरण्याआधीच क्रॅश झालं. आता भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची शर्यत जिंकणार का? याकडे सगळ्यांच लक्ष आहे. त्यामुळेच पाकिस्तानसह जगभरातील देशांच्या नजरा भारताच्या या मोहिमेकडे लागल्या आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या लोकांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ते भारताच्या चंद्र मोहिमेबद्दल बोलत आहेत.
खरं तर, जेव्हा पाकिस्तानच्या लोकांना भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेबद्दल प्रश्न विचारला तेव्हा ते आपल्याच देशाला (पाकिस्तानला) नावं ठेवत आहेत. पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे असे तो व्यक्ती सांगत आहे.
आम्हाला खायला पैसे नाहीत चांद्रयानसाठी कुठून आणणार
जेव्हा पाकिस्तानातील एका तरुणाला विचारण्यात आले की भारत चंद्रावर रॉकेट पाठवत आहे, ते आगामी काळात पाकिस्तानमध्येही पाहता येईल का… त्याला उत्तर देताना तो तरुण म्हणाला, “आम्हाला तरी अशी शक्यता दूर दूर पर्यंत वाटत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. भारताची चंद्र मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी भारत प्रयत्नशील आहे, ही खरोखर चांगली गोष्ट आहे. मात्र आमच्याकडे खायला पैसे नाहीत, ते कोट्यवधी पैसे कसे खर्च करणार. अशी प्रतिक्रिया तरुणानं दिली आहे.
पाहा व्हिडीओ
यापूर्वीही आणखी एका व्यक्तीचा व्हिडिओ समोर आला होता, जो आपल्याच देशावर टीका करत होता. पाकिस्तानातील या व्यक्तीने सांगितले की, आम्ही स्वतः काही करत नाही आणि इतरांच्या अपयशाचा आनंद साजरा करतो. इतर सर्व देश आमच्यावर हसतात कारण त्यांना माहित आहे की आम्ही काहीही करू शकत नाही.
पाकिस्तानी लोकांच्या व्हिडिओंव्यतिरिक्तही सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये चांद्रयान-३ चा उल्लेख करून पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे. पाकिस्तानातील लोकही भारताच्या या चंद्र मोहिमेला पाठिंबा देताना दिसत आहेत. आता प्रत्येकजण फक्त भारताचं मून मिशन पूर्ण होण्याची वाट बघत आहे.