अंकिता देशकर


Vehicles Running On Indian Flag Video: लाईटहाऊस जर्नालिझमला एक व्हिडिओ ट्विटर वर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. या व्हिडिओमध्ये गाड्या रस्त्यावर रंगवलेल्या भारतीय तिरंग्यावरून चालताना दिसतात. हा व्हिडीओ केरळमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र लाईटहाऊस जर्नालिझमने केलेल्या अभ्यासात व्हिडीओचे सत्य समोर आले आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

काय होत आहे व्हायरल?

एका ट्विटर यूजर ने व्हायरल व्हिडिओ शेअर केला.

इतर यूजर्स देखील हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

व्हिडीओमध्‍ये पहिली गोष्टजी आमच्या लक्षात आली ती म्हणजे पाकिस्तानचा ध्वज. आम्ही व्हिडिओ InVid टूलमध्ये अपलोड केला आणि व्हिडिओमधून काही स्क्रीनग्राब्स मिळवले. आम्ही स्क्रीनग्राबपैकी एकावर गूगल रिव्हर्स इमेज शोध वापरले असताना त्यासंबंधित एक ट्वीट समोर आले.

आम्हाला युट्युब वर व्हिडिओ देखील सापडला, ज्यात हा व्हिडिओ पाकिस्तानचा असल्याची पुष्टी करण्यात आली होती.

त्यानंतर आम्ही व्हिडिओचे बारकाईने निरीक्षण केले आणि काही खुणा तपासल्या. आम्हाला एका विशिष्ट दुकानावरील बोर्ड आढळून आला , ज्यावर ‘सनम बुटीक’ असे लिहिले होते. आम्ही ‘सनम बुटीक पाकिस्तान’ हे कीवर्ड वापरून गुगलवर सर्च केले.

आम्हाला गुगल मॅपवर दुकानाचे अचूक स्थान सापडले. रस्त्याचे दृश्य देखील व्हिडिओसारखेच दिसत होते.

https://goo.gl/maps/w6Td11zx8kX8vXvy5

आम्ही पाकिस्तानमधील एका पत्रकार सागर सुहिंदरोशी संपर्क साधला असता, त्यांनी रिक्षा, मोटारसायकल आणि इतर वाहने पाकिस्तानमधील असल्याची पुष्टी केली. गाड्यांवर पाकिस्तानी नोंदणी क्रमांकाच्या प्लेट्स आहेत आणि वाहतूक पोलिस वॉर्डन देखील पाकिस्तानचा आहे, असे देखील त्यांनी सांगितले.

हे ही वाचा<< शिर्डी साईबाबा मंदिरातली देणगी कुठे जाते बघा म्हणत व्हायरल केला Video; ‘हिंदूंनो डोळे उघडा’ सांगणाऱ्या ट्वीटचं सत्य काय?

निष्कर्ष: भारताच्या ध्वजावर वाहन चालवण्याचा व्हायरल व्हिडिओ केरळचा नसून पाकिस्तानचा आहे.

Story img Loader