Pakistani reporter video viral: भारताचा शेजारी देश पाकिस्तान नेहमीच चर्चेत असतो. या देशातील अनेक व्हिडीओ समोर येत असतात. हे व्हायरल व्हिडीओ कधी आपल्याला हसवतात तर काही आपल्याला थक्क करून जातात. आता सोशल मीडियावर पाकिस्तानातील एका महिला पत्रकाराचा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रिपोर्टिंग करणाऱ्या या पाकिस्तानी महिलेने असं काही केलं की, तिचा व्हिडीओ आता खूप व्हायरल होतोय.
पाकिस्तानचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत, जे पाहून हसू येईल. यातील बहुतांश व्हिडीओ पाकिस्तानींवर विनोद म्हणून दाखवले जातात. पण, नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला पत्रकार दिसत आहे, जी खूपच सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला माइक पकडून रिपोर्टिंग करताना दिसत आहे. पाकिस्तानी महिला पत्रकार भरपावसात रिपोर्टिंग करताना दिसत आहे.
सध्या देशात पावसाने हाहाकार माजवलेला आहे. भारतासोबतच पाकिस्तानातही मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आहे. त्यामुळे पाकिस्तानातील पावसाची स्थिती दाखवण्यासाठी पाकिस्तानातील एक महिला पत्रकार पावसाची स्थिती दाखवण्यासाठी भरपावसात उभी राहून रिपोर्टिंग करताना दिसतेय. पण, थोड्याच वेळात असं काही घडतं की या महिला पत्रकाराचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
(हे ही वाचा :पाकिस्तानच्या विमानाने तुम्ही कधी प्रवास केलाय का? प्रवाशाने शेअर केलेला Video पाहून तुमचीही झोप उडणार! )
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, पाकिस्तानातील एक पत्रकार महिला भरपावसात रस्त्यावर रिपोर्टिंग करताना दिसतेय. तिच्या बाजूने रस्त्यावरील वाहतूक सुरू आहे आणि ती रस्त्याच्या एका बाजूला उभी राहून हवामानाचे अपडेट देताना दिसतेय. पण, ज्यावेळी रिपोर्टर हवामानाचं अपडेट देत होती, तेव्हा अचानक असं काही घडते की त्या महिला पत्रकाराला हसू आवरत नाही आणि तिची क्यूट रिॲक्शन कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यादरम्यान तिच्या अंगावर पावसाचे पाणी पडते आणि मग ती हसून म्हणते की, ‘हे ही रेकॉर्ड करा, डिलीट करू नका.” गोंडस स्मितहास्य करत तिचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल आणि तिच्या निरागसतेच्या प्रेमात पडाल.
येथे पाहा व्हिडीओ
X वर शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत एका युजरने लिहिले आहे की, हा एक अप्रतिम व्हिडीओ आहे. त्याच वेळी दुसऱ्याने लिहिले आहे की, ही एक अतिशय गोंडस शैली आहे. हा व्हिडीओ ‘@socialist55’ नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला, कृपया कमेंट करून सांगा.