भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. याच रागामधून पाकिस्तानने भारताबरोबरच सर्व व्यापारी संबंध ताडकाफडकी संपुष्टात आणले. या निर्णयाचा भारतापेक्षा पाकिस्तानलाच अधिक फटका बसत असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. पाकिस्तानने भारतावर राग व्यक्त करण्यासाठी भारतीय मालिकांवर बंदी आणणे, पाकिस्तानी एअरस्पेस भारतासाठी बंद करणे, समझोता एक्सप्रेस बंद करणे यासारखे अनेक निर्णय घेतले आहेत. मात्र याचा भारतावर काहीच परिणाम झाला नसून पाकिस्तानच्याच अडचणी यामुळे वाढताना दिसत आहेत. त्यातच आता पाकिस्तानी नेटकऱ्यांनी #BoycottIndianProduct म्हणजेच भारतीय वस्तूंवर बंदी घालण्याचा हॅशटॅग ट्विटवर ट्रेण्ड केला आहे. मात्र आता या क्षेत्रातही भारतीयांनी हाच हॅशटॅग वापरुन पाकिस्तान आणि पाकिस्तानी नेटकऱ्यांना ट्रोल केले आहे.

कलम ३७० रद्द करणे भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे भारताने सर्वच देशांना ठामपणे सांगितले आहे. तर दुसरीकडे अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर इम्रान खान सरकारने प्रयत्न करुनही पाकिस्तानला या प्रकरणामध्ये कोणत्याही देशाने थेट पाठिंबा दिलेला नाही. प्रत्येक ठिकाणी भारताचा विरोध करायला जाणाऱ्या पाकिस्तानवरच डाव पलटतानाचे चित्र दिसत आहे. हेच चित्र आता ऑफलाइन आयुष्यातून ऑनलाइनवरही दिसू लागले आहे. आपल्याकडे भारतीय उत्पादने वापरली जातात. त्यांचा वापर बंद केला पाहिजे अशा उद्देशाने पाकिस्तानमधील नागरिकांनी #BoycottIndianProduct हा ट्रेण्ड सुरु केला. यामध्ये अगदी भारतीय कंपन्यांची यादी, उत्पादनांची यादी पासून ते अनेक आकडेवारी पाकिस्तानी नेटकऱ्यांनी पोस्ट केली.

मात्र जेव्हा या ट्विट्सच्या वादात भारतीयांनी उडी घेतली तेव्हा पाकिस्तानी नेटकऱ्यांची बोलतीच बंद झाली. भारतीय नेटकऱ्यांनी हाच हॅशटॅग वापरुन पाकिस्तानी नेटकऱ्यांची पोलखोल केली.

१)
साधी टोमॅटो घेऊ शकत नाही

२)
थांबा जरा हसू द्या

३)
पाण्यापासून सुरुवात करा

४)
यादी

५)
यात तुमचं नुकसान

६)
सिंधूचं पाणी बंद करा

७)
सगळं बंद केलं तर

८)
बोलू द्या त्रास झालाय त्यांना

९)
घंटा फरक नाही पडत

१०)

हा ट्रेण्ड पाहिल्यावर इम्रान खान यांची रिअॅक्शन

११)
कठीण वेळ असताना

१२)

असं झालं

१३)

कारण

१४)

हल्ला केल्यास

१५)

इम्रान खान यांची परिस्थिती

१६)

काय चाललयं हे

१७)
पाणी सुद्धा तयार करु

१८)
तुम्हाला नाही जमणार

१९)

स्वागत

२०)

भीक नको पण..

दरम्यान, पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था आधीच कोलमडलेल्या स्थितीत असताना भारताबरोबरच्या व्यापारबंदीमुळे भारतामधून पाकिस्तानात जाणाऱ्या वस्तूंची निर्यात थांबली आहे. त्यामुळे कांदे आणि टोमॅटोसारख्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या किंमती पाकिस्तानमध्ये भरमसाठ वाढल्या आहेत.

Story img Loader