भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. याच रागामधून पाकिस्तानने भारताबरोबरच सर्व व्यापारी संबंध ताडकाफडकी संपुष्टात आणले. या निर्णयाचा भारतापेक्षा पाकिस्तानलाच अधिक फटका बसत असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. पाकिस्तानने भारतावर राग व्यक्त करण्यासाठी भारतीय मालिकांवर बंदी आणणे, पाकिस्तानी एअरस्पेस भारतासाठी बंद करणे, समझोता एक्सप्रेस बंद करणे यासारखे अनेक निर्णय घेतले आहेत. मात्र याचा भारतावर काहीच परिणाम झाला नसून पाकिस्तानच्याच अडचणी यामुळे वाढताना दिसत आहेत. त्यातच आता पाकिस्तानी नेटकऱ्यांनी #BoycottIndianProduct म्हणजेच भारतीय वस्तूंवर बंदी घालण्याचा हॅशटॅग ट्विटवर ट्रेण्ड केला आहे. मात्र आता या क्षेत्रातही भारतीयांनी हाच हॅशटॅग वापरुन पाकिस्तान आणि पाकिस्तानी नेटकऱ्यांना ट्रोल केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा