पंजाबमधील अटारी-वाघा बॉर्डर ही भारत -पाकिस्तान या दोन देशांमधील लक्ष्मणरेषा महत्त्वाची मानली जाते. दररोज हजारहून अधिक पर्यटक या सीमेवरील भारताचे बीएसएफचे जवान आणि पाकिस्तानचे रेंजर्स यांच्यात रंगणारी बिटिंग रिट्रीट सेरेमनी पाहण्यासाठी येत असतात. पर्यटक नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी खास गर्दी करतात. दोन्ही देशांचे सैनिक परेड करत एकमेकांना आव्हानात्मक मानवंदना देतात. सैनिकांच्या नजरा आणि त्यांचे जोशपूर्ण हावभाव पाहून भान हरपून जाते.

पण, अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत लग्नातील वऱ्हाडासाठी ठेवलेल्या पाकिस्तानी बँड पथकाने पाकिस्तानच्या रेंजर्सला टफफाइट दिली आहे. पाकिस्तानी सैनिकांच्या वेशभूषेत असलेल्या पुरुषांच्या एका बँड पथकाने फूट स्टॉपिंग करून दाखवले. बँड पथकाचे हे अनोखे सादरीकरण पाहून लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडामध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लग्नापेक्षा बँड पथकाचे सादरीकरण पाहण्यासाठीच पाहुण्यांनी गर्दी केली होती. पण, हा व्हिडीओ पाकिस्तानचा आहे याची लोकसत्ता डॉट.कॉम पुष्टी करत नाही. एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) हा व्हिडीओ पाकिस्तानमधील असल्याचा दावा केला जात आहे.

एक्सवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक पुरुष बँडच्या ठेक्यावर पाकिस्तानी रेंजर्सप्रमाणे एका सरळ रेषेत डोक्यापर्यंत पाय पोहचवण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा तो जमिनीवर आदळतो. हे सादरीकरण पाहताना उपस्थितींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसून येत होते. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी आता वाघा बॉर्डरवर जाण्याची गरज नाही, त्याऐवजी एखाद्या व्यक्तीच्या लग्नात उपस्थित राहूनदेखील या प्रकारचे सादरीकरण पाहता येऊ शकते, असे म्हटले आहे.

बँड पथकाच्या सादरीकरणाने युजर्सचे चांगलेच मनोरंजन केले आहे. लग्न समारंभात बँड पथकाने वाघा बॉर्डरवरील बिटिंग रिट्रीट सोहळ्याप्रमाणे केलेले सादरीकरण पाहून लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani wedding shows bands copying attari wagah border retreat ceremony video viral sjr
Show comments