Pakistani Woman smiles after crushing 2 people: पाकिस्तानमधून एक व्हिडीओ समोर आला असून, त्यातून दिसणाऱ्या दुर्घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या दुर्घटनेचा संतापजनक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानातील एक महिला आपल्या कारने दोघांना चिरडल्यानंतरही हसताना दिसत आहे. तिला आपल्या कृत्याचा काहीच पश्चात्ताप नसून, वर ती माझे वडील कोण आहेत माहितीये का? अशी विचारणा करतेय. या महिलेविरुद्ध आता देशभरात संतापाचा भडका उडाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही राग अनावर होईल.
कराचीतील कारसाझ रोडवर १९ ऑगस्ट रोजी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रख्यात उद्योगपती दानिश इक्बालची पत्नी नताशा दानिश हिच्यावर तिची टोयोटा लँड क्रूझर बेदरकारपणे चालवल्याचा आरोप आहे. या अपघातात दोन लोकांचा मृत्यू झाला. घटनास्थळावरील व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि त्यामुळे महिलेने केलेल्या कृत्यामुळे लोकांच्या संतापात आणखी भर पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कराचीतील कारसाज रोडवर ही दुर्घटना घडली. अपघातानंतर तिला ताब्यात घेतले जात असताना नताशा गर्दीकडे पाहून हसत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या उद्धट वागणुकीचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात निषेध होत आहे. अपघातात बाप-लेकीच्या जोडीला जीव गमवावा लागला आहे आणि अन्य तीन जण जखमी झाले आहेत.
नताशा तिची एसयूव्ही गाडी वळवण्याचा प्रयत्न करीत असताना गाडी मोटरसायकलवर धडकली. त्यानंतर कार आणखी दोन दुचाकीस्वारांना धडकली. त्यानंतर एका व्हिडीओमध्ये ती म्हणताना ऐकू येते की, तुम मेरे बाप को नही जानते. या घटनेने कडक कायदे आणि त्यांच्या अंमलबजावणीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. नताशाला न्यायालयात हजर न केल्याने पोलिसांवरही टीका करण्यात आली आहे. तिचे वकील अमीर मनसुब यांनी दावा केला की, नताशाचे मानसिक आरोग्य अस्थिर आहे आणि तिच्यावर जिना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> एवढी हिम्मत येतेच कुठून? विद्यार्थ्याची मुख्याध्यापकांना मारहाण; VIDEO पाहून तुम्हीच सांगा यामध्ये चूक कुणाची?
सोशल मीडियावर हा व्हिडीओ trendingtodaymagazine नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर युजर्स संतापजनक प्रतिक्रिया देत महिलेवर टीका करीत आहेत. एका युजरने कमेंट केलीय की, “हिला कठोर शिक्षा झाली पाहिजे”, तर आणखी एकानं म्हटलंय, “हे फक्त पाकिस्तानातच होऊ शकतं.”