जर एखाद्या विद्यार्थ्याला कोटींच्या पगाराची नोकरीची ऑफर मिळाली तर आपल्या मनात पटकन विचार येतो की तो कोणत्या संस्थेमधून आधी आहे? असे पगार फक्त भारतीय विद्यापीठ, विशेषत: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIMs), आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NITs) संस्थातून उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच मिळतो. अशी प्रतिमा आणि विश्वासार्हता या संस्थानी तयार केली आहे. या संस्था म्हणजे भारतातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा बालेकिल्ला मानला जातो, जे त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर मिळवून देतात. नुकतेच एमआयटीच्या विद्यार्थ्याला हर्षल जुईकर याने गुगलकडून ५१.३६लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी मिळवली. चांगल्या पगाराची नोकरी मिळवल्याने त्याचे कौतूक होत आहे.

IIT अन् IIM न शिकताही चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची ही प्रतिमा गेल्या वर्षी पलक मित्तलने मोडली होती. अलाहाबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या (IIIT) बीटेक विद्यार्थी पलक मित्तलने अॅमेझॉनकडून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठे पगाराचे पॅकेज मिळवले होते. या पार्श्वभूमीवर, पलकला मिळालेले कोटींचे पॅकेज विक्रमी होते, ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.ॉ

success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
we the documentary maker Dheeraj akolkar
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
fraud of One lakh with CME professor in the name of courier
कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक
The first college in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय आहे पुण्यात! २०० वर्षे जुने हे कॉलेज माहितेय का?
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

हेही वाचा – इंडिया पोस्टमध्ये मेगा भरती! ३०,०४१ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या कोण करू शकते अर्ज

टेक्नॉलॉजीच्या दुनियेत चांगली सुरुवात

आयआयआयटी अलाहाबादच्या बी.टेक. ग्रॅज्युएट पलक चर्चेत आली जेव्हा अमेरिकेची कंपनी Amazon ने तिला एक कोटी पगाराच्या पॅकेजसह नोकरीची ऑफर दिली. तिच्या लिंक्डइन अकाउंटनुसार, पलक, जी सध्या बंगळुरूमध्ये फोनपेमध्ये काम करत होती ती ऑगस्टमध्ये अॅमेझॉनच्या बर्लिन ऑफिसमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून रुजू झाली.

हेही वाचा – IIT, IIM मध्ये शिकला नाही तरीही पुण्याच्या विद्यार्थ्याला गुगलकडून मिळाले ५१.३६ लाखांचे सॅलरी पॅकेज

पलकसह आणखी दोन विद्यार्थांना मिळाले कोटींचे पॅकेज

क्लाउड प्लेटफॉर्म्समध्ये अनुभव असणारी पलक AWS Lambda, AWS S3, AWS Cloudwatch, Typescript, Java, आणि SQL सारख्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये देखील एक्सपोर्ट आहे. हे यश फक्त पलकला एकटीला नाही मिळाले. तर तिच्यासह IIIT मध्ये शिकलेल्या अनुराग मकादेलादेखील गूगलकडून १.२५ कोटींचे आणि अखिल सिंह याला रुब्रिककडून १.२ कोटींचे पॅकेज मिळाले होते.

IIIT मधील या त्रिकूटाने आंतरराष्ट्रीय टेक लँडस्केपमध्ये कौतुकास्पद आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि जगभरातील भारतीय टेक पदवीधरांसाठी नवीन बेंचमार्क सेट केला आहे.