Palestine People Fake Blood Video: इस्त्रायल- पॅलेस्टाईन युद्धात सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व फोटो व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ लाइटहाऊस जर्नलिझमला X वर (पूर्व ट्विटरवर) मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत असल्याचे आढळला. पॅलेस्टिनी युद्धादरम्यान झालेल्या जखमा खोट्या आणि बनावट असल्याचा दावा व्हिडिओमध्ये केला जात होता. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा दावा इस्त्रायलच्या विरुद्ध सुद्धा करण्यात आला होता. मृतांचे फुटेज दाखवण्यासाठी सिनेमासारखे शूटिंग होत असल्याचे या ही व्हिडिओमध्ये म्हटले जात होते. तर आताच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा पॅलेस्टाईनचे नागरिक रक्तबंबाळ झाल्याचे दाखवण्यासाठी मेकअप करत असल्याचे सांगितले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Diksha Choudhary ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर यूजर्स देखील असाच दावा करत व्हायरल व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आमचा तपास सुरू केला. आम्ही Yandex सर्च इंजिनद्वारे InVid टूलद्वारे प्राप्त केलेल्या या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केले. आम्हाला एक स्क्रीनशॉट सापडला जो एका किफ्रेम सोबत मॅच होत होता.

फोटोवर मजकूर लिहला होता: Gaza Film Industry, Makeup artist breaks gender barriers.

हे फोटो YouTube व्हिडिओच्या स्क्रीनशॉटसारखे दिसत होते. टायटलमध्ये इंग्रजीत लिहले होते: Palestinian film industry | Cinema | Showcase आणि व्हिडिओवरील तारीख, २ मार्च २०१७ होती.

आम्ही Palestinian film industry | Cinema | Showcase असे युट्युब वर शोधले.

हा व्हिडिओ TRT World ने अपलोड केला होता, हे युट्युब चॅनेल एक Turkish Public Broadcast service चे आहे.

कॅप्शन मध्ये लिहले होते: गाझा पट्टीमध्ये जास्त चित्रपट निर्माते नाहीत. पण मेकअप आर्टिस्ट मरियम सलाहला तिचे स्वप्न पूर्ण करण्यापासून थांबली नाही. तिने स्वतःला पॅलेस्टिनी चित्रपटांसाठी बनावट रक्त बनवायला शिकवले आणि पारंपारिकपणे पुरुषी मक्तेदारी असलेल्या कामात तिने आपले स्थान तयार केले.

या व्हिडिओ मध्ये, Mariam Salah यांचा इंटरव्यू देखील आहे.

हे ही वाचा<< इस्त्रायलमध्ये घुसखोरी करताना विजेच्या तारांमध्ये अडकून मृत्यू? थरारक Video चर्चेत पण ‘ही’ बाब माहित असणं गरजेचं!

निष्कर्ष: पॅलेस्टाईनचे लोक दुखापतींचे चित्रण करण्यासाठी बनावट रक्ताचे मेकअप करत असल्याचे सांगणारे व्हायरल व्हिडिओ खोटे आहेत. हा व्हिडीओ मेकअप आर्टिस्ट मरियम सलाहचे काम दर्शवितो आणि तिने पॅलेस्टिनी चित्रपटांसाठी बनावट रक्त बनवण्यास स्वतःला कसे शिकवले आहे हे या व्हिडिओ मध्ये सांगितले गेले आहेत. व्हायरल दावे खोटे आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palestine people fake blood make up to show israel being cruel in gaza controversial video real sides fact check here svs