Palestine Terrorist Attack On Self Video: मागील कित्येक आठवडे सुरु असणाऱ्या इस्त्रायल पॅलेस्टाईन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सुद्धा दोन गट पडले आहेत. सुरुवातीला बहुसंख्य लोकांचा पाठिंबा हा इस्त्रायलच्या बाजूने होता मात्र आता पॅलेस्टाईनमधील भीषण स्थिती व मृतांचे व्हिडीओ पाहून अनेकांनी इस्त्रायलने सुद्धा सामंजस्य दाखवावे अशी मागणी केली आहे. या दरम्यान दोन्ही बाजूंनी विविध दावे करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक दावा लाइटहाऊस जर्नलिझमला इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत असल्याचे आढळले. या व्हिडिओमध्ये एक दहशतवादी स्फोटके उडवताना स्वतःवरच हल्ला करत असल्याचे दिसत आहे. हा पॅलेस्टिनी दहशतवादी इस्रायली पोझिशन्सवर स्फोटके लाँच करत असल्याचा दावा व्हिडिओसह करण्यात आला होता.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर David Atherton ने व्हायरल विडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केली.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
Navri Mile Hitlarla
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील एजे-लीलाच्या रोमँटिक सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Salman Khan And Digvijay Rathee
Video : ‘बिग बॉस १८’मधून बाहेर पडताच दिग्विजय सिंह राठी झाला भावुक; खंत व्यक्त करीत म्हणाला, “लोक खूप लवकर…”
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
a child girl cried as young girl asked questions to her
VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हायरल व्हिडिओचे काही स्क्रीनशॉट घेऊन आणि त्यावर Google रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला. आम्हाला dailymotion.com वर पोस्ट केलेला व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ १६ वर्षांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता.

यातूनच स्पष्ट होते की हा व्हिडीओ सध्या सुरु असणाऱ्या युद्धातील नाही. अधिक तपासल्यावर, आम्हाला archive.org वर अपलोड केलेला व्हिडिओ आढळला.

https://archive.org/details/TerroristBlowsHimselfUpWithMortar

व्हिडिओमध्ये नमूद केलेली प्रकाशन तारीख ५ एप्रिल २०१३ आधी होती.

हा व्हिडिओ ‘अल-हरब अल-अहलिया अल-सूरिया’ ने अपलोड केला होता, या लिंकवर हे व्हिडिओ सीरियन गृहयुद्धातील असल्याचे नमूद केले आहे.

https://archive.org/details/@al-_arb_al-ahliyya_al-s_riyya_the_syrian_civil_war

व्हिडीओ मिलिटरी डॉट कॉम ने देखील त्यांच्या व्हिडिओ स्टोरीमध्ये अपलोड केला होता ज्यामध्ये टॉप 10 मोर्टार फेल दाखवण्यात आले होते. या व्हायरल झालेल्या व्हिडीओला पहिल्या क्रमांकावर स्थान देण्यात आले.

https://www.military.com/video/guns/mortars/top-10-mortar-fails/3595016149001

आम्हाला हा व्हिडिओ एका gif वेबसाईट वर देखील सापडला.

https://makeagif.com/gif/islamist-insurgent-in-iraq-mortar-fail-SSAvKc

हे ही वाचा<< केरळमध्ये मुस्लिमांचा पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मोर्चा? ध्वज आणताना केली मोठी चूक? Video ची खरी बाजू पाहाच

निष्कर्ष: पॅलेस्टाईन दहशतवाद्याने स्फोटके उडवताना स्वतःवरच हल्ला केल्याचा व्हायरल व्हिडिओ १० वर्षे जुना आहे आणि अलीकडील इस्रायल गाझा युद्धाशी संबंधित नाही.

Story img Loader