Palghar dabhosa waterfall video: जगात अनेक प्रकारचे अॅडव्हेंचरस स्पॉट्स आहेत. यामध्ये धबधब्यांचाही समावेश आहे. निसर्गाने हे अतिशय विलोभनीय दृश्यं निर्माण केले आहेत. काही ठिकाणी उंचावरून कोसळणारे धबधबे लोकांना भुरळ घालतात. मात्र याचठिकाणी जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. दरम्यान पालघरमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. १२० फुटावरुन उडी मारण्याचा उत्साह या तरुणाच्या जीवावर बेतला. याचा लाईव्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. या घटनेत दोन तरुणांनी अकमेकांचा हात पकडला, धबधब्यात उडी मारली पण एक जण वर आलाच नाही.. असं नेमंक झालं काय? चला जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मृत्यूची उडी

पालघर जिल्ह्यातील जव्हारमधील प्रसिद्ध असलेल्या दाभोसा धबधब्यात १२० फूट उंचावरून दोन पर्यटकांनी उड्या मारल्या. प्रसिद्ध दाभोसा धबधबा सुरू होतो तेथून थेट १२० फूट उंचीवरून खोल डोहात उडी मारली यात एक पर्यटक वरती आलाच नाही. तर दुसरा वरती आला मात्र गंभीर जखमी अवस्थेत, ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.दाभोसा धबधब्यात मुंबई मिरा-भाईंदर येथील २४ वर्षीय तीन तरुण मित्र पर्यटक दाभोसा धबधब्या जवळ आले, त्यांना येथील पाण्याच्या व डोहाच्या खोलीचा कुठलाच अंदाज न्हवता. यातील दोन पर्यटकांनी थेट धबधबा सुरू होतो तेथे पोहोचले तर तिसरा पर्यटक खाली डोहा जवळून त्यांचा व्हिडिओ काढत होता.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास काही तरुण आंघोळीसाठी धबधब्याजवळ पोहोचले. यावेळी दोन तरुणांनी १२० फूट उंचीवर असलेल्या धबधब्यावर चढाई केली. यानंतर काही वेळ घेतल्यानंतर दोघांनीही तेथून उडी घेतली. ही संपूर्ण घटना तरुणाच्या मित्राने फोनच्या कॅमेऱ्यात कैद केली होती.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पाठीमागून मृत्यू आला अन्…अचानक रस्त्यावर थरारक अपघात; पण चूक कुणाची? VIDEO पाहून चक्रावून जाल

एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

माझ शेख आणि झोएब अशी उडी मारणाऱ्या तरुणांची नावे आहेत. माझ शेख (वय 24) याचा उडीनंतर मृत्यू झाला, तर झोएब गंभीर जखमी झाला. झोएबला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडवरील काशिमिरी येथून तीन तरुण दाभोसा तलावाला भेट देण्यासाठी आले होते आणि तिघेही मित्र आहेत. दोन्ही तरुणांनी धबधब्यावरून उडी मारल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुण धबधब्याच्या उंचीवर असलेल्या एका दगडावर कसे चढून उडी मारत आहेत, हे दिसत आहे.