Palm Oil Fact Check : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडियावर पाम तेलासंदर्भात लिहिलेली एक भली मोठी पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केली जात असल्याचे आढळून आले. या पोस्टमध्ये पाम तेल आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, याविषयी माहिती देण्यात आली आहे. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉ. पी. के. सामंतराय यांच्या नावाने ही पोस्ट व्हायरल केली जात आहे, ज्यात पाम तेल हे हार्टअटॅक, मधुमेहाच्या रुग्णांसाठी विशेषत: लहान मुलांच्या आरोग्यासाठी सर्वात घातक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पाम तेलाचा वापर दैनंदिन खाद्यपदार्थांमध्ये करून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणत असल्याचा आरोप या पोस्टमधून करण्यात आला आहे. तसेच लोकांनाही पाम तेलापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळण्याचे आणि त्याच्या वापराविरोधात जागरूकता पसरवण्याचे आवाहनही या पोस्टमधून करण्यात आले आहे. पण, खरंच एम्स रुग्णालयातील डॉ. पी. के. सामंतराय यांनी पाम तेलाबाबत अशी कोणती पोस्ट लिहिली आहे का, याबाबत आम्ही तपास सुरु केला, तेव्हा या पोस्टमागची एक खरी बाजू समोर आली आहे, ती नेमकी काय आहे जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

इंग्रजीत मेसेज खालील प्रमाणे होता:

[A very important message from my network]
Dear Friends!
I am Dr. P K Samantaray, MBBS, MD from AIIMS, New Delhi.
I am working as Professor and HOD Psychiatry, at Jagjivan Ram Hospital, Mumbai.
I would like to make a small request to you.
Before that, I would like to share a small piece of information with you.
Many of you might have read today’s newspapers that
EMRI results say, majority of people having Heart Attack are less than 50 years old.
You will be surprised to know the culprit is Palm Oil. It’s far far more dangerous than Alchol and Smoking put together.
India is the highest importer for Palm oil in this world.
The Palm oil mafia is very very big.
Our children, who are the future, are at a big risk.
There is no fast food available in this country without Palm Oil.
If you go to our grocery store, try to pick up a children’s edible food without Palm oil – you will not succeed.
You will be interested to know even Biscuits of big companies are made from it, and similarly all chocolates.
We are made to believe they are healthy, but we never knew about the killer Palm oil or Palmitic acid
The big companies like Lays use different oil in Western Countries and Palm oil in India just because it is Cheap.
Each time our child eats a product with Palm Oil, the brain behaves inappropriately and signals to secrete fat around and in the Heart This leads to Diabetes at a very young age.
The World Economic Form has projected that 50 percent of people who Die at young age will die of Diabetes and Heart Disease.
The Palm Oil mafia has made our Children addicted to Junk Food, leaving the fruits and Vegetables aside, which are Heart protective.
Next time you buy something for your child, see the label of the product.
If it has Palm oil or Palmolienic oil or Palmitic acid, avoid buying it!
We, have written to our Hon’ble Prime Minister and are also in the process of making similar letters from 1 Lakh Doctors across India to take some action to secure our future generations.
Once again.
I want to emphasize on impending danger to our children.
Pls protect our Children. They are the future of our Country! Please forward this message.
Don’t forget to forward this to your close friends and family members. Please note to send. as many persons as possible.
P. S: please share without editing.

भाषांतर:
[माझ्या संपर्कात असलेल्या लोकांना एक अतिशय महत्त्वाचा मेसेज]
प्रिय मित्रांनो!
मी डॉ. पी. के. सामंतराय, नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातील एमबीबीएस, एमडी आहे.
मी जगजीवन राम हॉस्पिटल, मुंबई येथे प्रोफेसर आणि HOD मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करत आहे.
मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करू इच्छितो.
त्याआधी मी तुमच्याशी एक छोटीशी माहिती शेअर करू इच्छितो.
तुमच्यापैकी अनेकांनी आजच्या र्तमानपत्रांमध्ये वाचले असेल.
ईएमआरआयच्या निकालानुसार, हार्टअटॅकबाधित बहुतेक लोकांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हार्टअटॅकचे प्रमाण पाम तेलाच्या वापरामुळे वाढतेय.
पाम तेल हे अल्कोहोल आणि धूम्रपानापेक्षा जास्त धोकादायक आहे.
या जगात भारत हा पाम तेलाचा सर्वाधिक आयात करणारा देश आहे.
पाम तेल माफिया खूप मोठा आहे.
आपली मुलं, जे भविष्य आहेत, त्यांना याचा मोठा धोका आहे.
या देशात पाम तेलाशिवाय कोणताही फास्ट फूड पदार्थ तयार होत नाही.
आपण कधी किराणा दुकानात गेल्यास, मुलांसाठी पाम तेलाशिवाय बनवलेले खाद्यपदार्थ घेण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला मिळणारच नाही.
मोठमोठ्या कंपन्यांच्या बिस्किटांमध्येही पाम तेलाचा वापर होतो, ती बनवण्यासाठी पाम तेल वापरले जाते, त्याचप्रमाणे सर्व चॉकलेट्सही बनतात.
पण हे तुमच्या आरोग्यासाठी निरोगी आहे, असा विश्वास तुम्हाला या कंपन्यांकडून दिला जातो.
परंतु, आपल्याला त्या पदार्थांमध्ये जीवघेणे पाम ऑइल किंवा पामिटिक ॲसिड आहे, याबद्दल कधीच माहिती दिली जात नाही.
Lays सारख्या मोठ्या कंपन्या पाश्चात्य देशांमध्ये वेगवेगळे तेल वापरतात आणि भारतात पाम तेल वापरतात, का तर ते स्वस्त आहे म्हणून.
प्रत्येक वेळी आपले मूल पाम तेलापासून बनवलेले पदार्थ खातो. अशाने त्यांच्या मेंदूची वाढ नीट होत नाही आणि हृदयाभोवती आणि हृदयात चरबीस्राव जमा होण्यास सुरुवात होते, यामुळे अगदी लहान वयातच त्यांना मधुमेह होतो.
वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्मने असा अंदाज वर्तवला आहे की, तरुण वयात मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी ५० टक्के लोकांचा मृत्यू मधुमेह आणि हृदयविकाराने झाला आहे.
पाम ऑइल माफियांमुळे आमच्या मुलांना जंक फूडचे व्यसन जडत आहे, हृदयाचे संरक्षण करणाीरी फळे आणि भाज्या बाजूला ठेवून ते हे जंक फूड खातात.
पुढच्या वेळी तुम्ही तुमच्या मुलासाठी काही खरेदी कराल तेव्हा उत्पादनाचे लेबल पाहा.
जर त्यात पाम तेल किंवा पामोलिनिक तेल किंवा पाल्मिटिक ॲसिड असेल तर ते खरेदी करणे टाळा!
आम्ही आमच्या माननीय पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे आणि भारतभरातील एक लाख डॉक्टरांकडून अशीच पत्रे तयार करण्याच्या प्रक्रियेत आहोत. जेणेकरून आमच्या भावी पिढ्यांना सुरक्षित करण्यासाठी एक पाऊल उचलता येईल.
मला आमच्या मुलांना येऊ घातलेल्या धोक्यांबाबत सतर्क करायचे आहे.
कृपया आमच्या मुलांचे रक्षण करा. ते आपल्या देशाचे भविष्य आहेत! कृपया हा मेसेज फॉरवर्ड करा.
तुमच्या जवळच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना फॉरवर्ड करायला विसरू नका. कृपया जास्तीत जास्त लोकांना हा मेसेज फॉरवर्ड करा.

हेही वाचा – VIDEO : पै-पै जोडून उभा केलेला संसार अक्षरश: पाण्यात; घाटकोपरमधील मनाला चटका लावणारे दृश्य

ही मेसेज पोस्ट इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर केली जात आहे.

तपास:

आम्ही या टेक्स्ट मेसेजच्या कॉन्टेंटवर Google टेक्स्ट सर्च करत आमची तपासणी सुरू केली. यावेळी पाम तेलाच्या हानिकारक प्रभावांबद्दल एम्सचे डॉक्टर पी. के. सामंतराय यांनी लिहिलेला कोणताही मजकूर, लेख किंवा ब्लॉग आम्हाला आढळला नाही.

त्यानंतर आम्ही एम्सचे डॉ. DR P K Samantaray यांचे नाव गूगल सर्च केले, तेव्हा आम्हाला डॉ. पी. के. सामंतराय यांचे फेसबुक पेज सापडले.

त्यांच्या फेसबुक पेजच्या बायोमध्ये लिहिले होते की, मी एक मानसोपचारतज्ज्ञ आहे. मी एम्स नवी दिल्लीतून पास आउट झालो आहे. सध्या सेंट्रल रेल्वेत मुख्य मानसोपचारतज्ज्ञ आणि मुख्य वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत आहे.

त्यांच्या फेसबुक पेजवर व्हायरल मेसेजसारखे टेक्स्ट आम्हाला आढळून आले नाही.

पेजवर त्यांचा फोन नंबरदेखील नमूद केला होता, म्हणून आम्ही डॉ. पी. के. सामंतराय यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या नावाने मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असलेल्या मेसेजबाबत माहिती विचारली. ज्यावर त्यांनी आम्हाला सांगितले की, त्यांच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मेसेज हा त्यांनी लिहिलेला किंवा शेअर केलेला नाही.

आम्हाला काही संशोधनपर लेख सापडले, ज्यात पाम तेलाच्या हानिकारक प्रभावांविषयी लिहिले होते.

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6357563/
https://www.webmd.com/vitamins/ai/ingredientmono-1139/palm-oil

हार्वर्ड वेबसाइटवरील एका लेखात नमूद केले आहे की, पाम तेल, पाम कर्नल तेल आणि कोकनट ऑइल तसेच उष्णकटिबंधीय प्रदेशातील तेलाचे प्रकार – जे आरोग्यासाठी चांगले नाहीत, कारण त्यात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण अधिक आहे, ज्याच्या वापरामुळे हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

https://www.health.harvard.edu/staying-healthy/by-the-way-doctor-is-palm-oil-good-for-you

भारतात पाम तेलावर बंदी घालण्यासाठी Change.org या पेजवर याचिकाही दाखल करण्यात आली होती.

https://www.change.org/p/ministry-of-health-the-unhealthy-palm-oil-shall-be-banned-in-india

ही याचिका प्रदीप अग्रवाल नावाच्या एका व्यक्तीने दाखल केली होती. या याचिकेत जो मजकूर होता, तोच मजकूर डॉ. पी. के. सामंतराय यांच्या नावाने आजही मोठ्या प्रमाणात शेअर केलेल्या मेसेजमध्ये आहे.

निष्कर्ष : एम्सचे डॉ. पी. के. सामंतराय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असलेला पाम तेलाच्या हानिकारक प्रभावांबद्दल इशारा देणारा व्हायरल मेसेज शेअर केला नाही, त्यामुळे व्हायरल केला जाणारा मेसेज आणि त्यातील दावे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत.